Full Width(True/False)

'आजोबा व्हायच्या वयात हा तिसरी बायको शोधतोय', भाजप नेत्याचं आक्षेपार्ह वक्तव्य

मुंबई: काही दिवसांपासून सिनेसृष्टीत चर्चा आहे ती अभिनेता आमिर खानच्या घटस्फोटाची. त्यानं आणि किरण रावनं विभक्त होण्याचा निर्णय घोषित केला. घटस्फोटासंदर्भात दोघांनीही प्रसिद्धीपत्र शेअर केलं आहे. असं असलं तरी सोशल मीडिावर त्यांना ट्रोल करण्यात आलं.आता भाजप नेत्यानं देखील यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भाजप खासदार यांनी आमिर आणि किरण यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. वक्तव्य करताना त्यांची जीभ घसरली. ' आजोबा व्हायच्या वयात हा आता तिसरी बायको शोधतोय', असं वक्तव्य सुधीर गुप्ता यांनी केलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काय म्हटलं आहे सुधीर गुप्ता यांनी?'आमिर खाननं पहिली पत्नी हिला दोन मुलं झाल्यानंतर सोडून दिलं. किरण रावलाही एक मुलगा आहे. आता आजोबा व्हायचं वय झालं अन् तो आता तिसऱ्या पत्नीच्या शोधात आहे', असं गुप्ता म्हणाले आहेत. 'आयुष्याच्या नव्या टप्प्याला सामोरे जायचे आहे'आमिर आणि किरण यांनी संयुक्तपणे दिलल्या प्रसिद्धी पत्रकात, या पंधरा वर्षांत आम्ही अनेक आनंदाचे, समाधानाचे, हास्याचे सुरेख क्षण एकत्रित अनुभवले, असे म्हटले आहे. ‘विश्वास, आदर आणि प्रेम या आघाड्यांवर आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. आता आम्हाला आयुष्याच्या नव्या टप्प्याला सामोरे जायचे आहे. या प्रवासात आम्ही नवरा-बायको असणार नाही. आम्ही मुलांसाठी सहपालक असणार आहोत. एकमेकांच्या कुटुंबीयांसाठी सदैव सोबत असू. विभक्त होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी आम्ही विचारपूर्वक घेतला. यासंदर्भात औपचारिक प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. आम्ही स्वतंत्र राहू मात्र एकमेकांच्या कुटुंबाचा भाग असू. आझाद या आमच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आमच्यावर एकत्रितपणे आहे. चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसेच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आमिर खानचा पहिला विवाह रीना दत्ता यांच्याशी १९८६मध्ये झाला होता. दोघे २००२मध्ये विभक्त झाले. त्यांना जुनैद आणि इरा ही मुले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2U3R4Qg