Full Width(True/False)

आता Oppo स्मार्टफोनमध्येही व्हर्च्युअल मेमरी अलोकेटचा पर्याय,वाढविता येणार RAM,पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. व्हर्च्युअल रॅम विस्तार तंत्रज्ञान या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ओप्पो स्मार्टफोन वापरकर्ते त्यांच्या फोनची रॅम विस्तृत करू शकतील. कंपनीने प्रथम सिंगापूर प्रदेशासाठी हे वैशिष्ट्य आणले. आता ही कंपनी मध्य-पूर्व आणि आफ्रिकन देशांमध्येही हे वैशिष्ट्य आणणार आहे. व्हिव्हो, आयक्यूओ, रियलमीच्या नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्टफोनमध्ये व्हर्च्युअल रॅम एक्सपेंशन फीचर देण्यात आले आहे. स्मार्टफोनसाठी ओप्पोने आणलेल्या या तंत्रज्ञानामध्ये वापरकर्त्याच्या स्मार्टफोनची Internal Memory (रॉम) रॅममध्ये रूपांतरित झाली आहे. वाचा: तंत्रज्ञान असे करते काम समजा ओप्पो स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आहे आणि वापरकर्त्यांना त्यांच्या फोनची रॅम ८ जीबी पर्यंत वाढवायची असेल तर त्यांना या नवीन तंत्रज्ञानामध्ये व्हर्च्युअल रॅमचा विस्तार करण्याचा पर्याय मिळेल. वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनची रॅम जास्तीत जास्त ७GB पर्यंत वाढवू शकतील. हे नवीन तंत्रज्ञान विशेषत: गेमिंग वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरेल. असे बरेच हाय-एंड गेम आहेत ज्यांना अधिक रॅमची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, ओप्पो वापरकर्ते त्यांच्या बजेट फोनची रॅम विस्तृत करुन उच्च ग्राफिक्स गेम खेळू शकतील. हे एनेबल करा ओप्पोचे हे नवीन फीचर नवीन अपडेटसह येईल. यासाठी वापरकर्त्याला त्याच्या फोनच्या सेटींगवर जावे लागेल. यानंतर, व्हर्च्युअल मेमरीचे अलोकेट करण्याचा पर्याय About फोन पर्यायात दिसेल. व्हर्च्युअल रॅम अलोकेट केल्यानंतर वापरकर्त्यास त्याचा स्मार्टफोन पुन्हा सुरू करावा लागेल. आलेल्या अहवालानुसार ओप्पोचे हे नवीन वैशिष्ट्य ए ९, ए ७४ आणि रेनो ५ स्मार्टफोनसाठी आणले गेले आहे. अलीकडेच प्रकाशित झालेल्या जून २०२१ च्या अपडेटसह वापरकर्त्यांना हे वैशिष्ट्य मिळेल. जर हा पर्याय आपल्या ओप्पो स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नसेल तर मात्र त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SLDqke