नवी दिल्लीः रियलमी भारतात फक्त १० हजार रुपयांच्या किंमतीत सब प्राइस सेगमेंट मध्ये ५जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. याची माहिती रियलमीचे सीईओ माधव शेठ यांनी दिली आहे. ज्यांना स्वस्तात ५ जी स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. या फोनवरून स्वस्त ५जी स्मार्टफोनचा आनंद घेऊ शकतात. वाचाः रियलमीचे हे स्मार्टफोन पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये लाँच केले जाणार आहेत. ५जी बजेट स्मार्टफोनवरून कंपनीने जास्त काही कन्फर्म केले नाही. कंपनीने हेही कन्फर्म केले आहे की, रियलमी २०२१ च्या सर्व प्रोडक्ट्स ज्याची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल त्यात ते ५जी स्मार्टफोन असतील. याआधी कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला म्हटले होते की, २० हजार रुपयांच्या वरच्या सर्व प्रोडक्ट्समध्ये ५जी एनेबल्ड असेल. आता कंपनीने हा आकडा १५ हजार रुपयांपर्यंत खाली आणला आहे. कंपनीने सांगितले की, १० हजार रुपयांच्या सेगमेंट मध्ये ५जी स्मार्टफोन आणण्याची तयारी केली जात आहे. वाचाः ५जी स्मार्टफोन लाइटवेट डिझाइन सोबत येतील. कंपनीकडून हेही कन्फर्म करण्यात आले आहे की, काही मॉडल्स Realme GT 5G सीरीज च्या आत मध्ये लाँच केले जाणार आहेत. यात एक मॉडलला वर्षाच्या तिसऱ्या क्वॉर्टर मध्ये लाँच केले जाणार आहे. यावरून हे कन्फर्म करण्यात आले नाही की, जुलैच्या अखेरपर्यंत या डिव्हाइसला लाँच केले जाऊ शकते की नाही. रियलमीने सांगितले की, याचा प्रीमियम डिव्हाइस लेटेस्ट फ्लॅगशीप प्रोसेसर सोबत येईल. तसेच अफोर्डेबल किंमतीवर उपलब्ध असेल. हे क्वॉलकॉम ८८८ चिपसेटवर चालू शकते. कंपनी नवीन ५जी फोन्स रियरलमी नार्जो सीरीजमध्ये सुद्धा लाँच करण्याचा प्लान करीत आहे. कंपनीने Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro स्मार्टफोनला आधीच ५जी सोबत लाँच केले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dWTua3