नवी दिल्ली. रिअलमी डेज सेल अंतर्गत रियलमी ७ प्रो वर मोठी सवलत दिली जात आहे. यात रिअलमी ७ प्रो च्या किंमतीवर ४,००० रुपयांची सूट दिली जात आहे. हा स्मार्टफोन मागील वर्षी १९,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला होता. रिअलमी ७ प्रोमध्ये ५जी ची कमतरता भासू शकते. कारण, ही सेवा भारतात अधिकृतपणे सुरू केलेली नाही. पण, यातील इतर वैशिष्ट्यांमुळे तुम्ही तो नक्कीच विकत घेऊ शकता. वाचा: किंमत आणि ऑफर मिरर सिल्वर किंवा मिरर ब्लॅक कलर व्हेरिएंटवर रिअलमी 7 प्रो १५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सन किस्ड लेदर व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे. या व्यतिरिक्त, हा स्मार्टफोन आपण मोबीक्विक किंवा फ्रीचार्ज वॉलेटमधून घेतल्यास रिअलमे यावर कॅशबॅक ऑफर देखील मिळवू शकता. रियलमी डेज सेल चा लाभ तुम्हाला ९ जुलैपर्यंत घेता येईल. ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइडवर आधारित रिअलमी यूआय वर चालतो आणि यात ६.४ इंचाचा फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये १८० हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेटही देण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर असून ८ जीबी पर्यंतचा एलपीडीडीआर ४ एक्स रॅम आणि अंड्रेनो ६१८ जीपीयू आहे. फोटोग्राफीसाठी, त्याच्या मागील बाजूस एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ६४ एमपीचा आहे. याव्यतिरिक्त, येथे एक ८ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, २ एमपी मोनोक्रोम कॅमेरा आणि २ एमपी मॅक्रो देखील आहे. सेल्फीसाठी समोर ३२MP कॅमेरा देण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qOvNpz