Full Width(True/False)

Samsung च्या ‘या’ ५जी फोनवर बंपर सूट, २ हजार रुपये डिस्काउंटसह मिळेल एक्सचेंज ऑफर

नवी दिल्ली : चा लोकप्रिय ५जी Samsung Galaxy M42 ला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनला वर Deal of the Day ऑफरमध्ये लिस्ट करण्यात आले असून, ही आज रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहिल. या डीलमध्ये ग्राहक बंपर डिस्काउंटसह सॅमसंगचे ५जी स्मार्टफोन खरेदी करू शकतील. यामध्ये डिस्काउंट ऑफर, एक्सचेंज ऑफरसह अनेक प्रकारचे डिस्काउंट मिळत आहे. वाचाः किंमत आणि डिस्काउंट ऑफर Samsung Galaxy F42 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २१,९९९ रुपयात येतो. फोनला HDFC बँक क्रेडिट कार्ड ने खरेदी केल्यास २ रुपये इंस्टंट सूट मिळते. अशात ८ जीबी व्हेरिएंटला २१,९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम व्हेरिएंटला १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के सूट दिली जात आहे. फोनवर ११,४०० रुपये एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. सोबतच फोनला नो-कॉस्ट ईएमआय पर्यायसह खरेदी करता येईल. वाचाः Samsung Galaxy M42 चे स्पेसिफिकेशन्स 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच HD+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम Snapdragon ७५०G प्रोसेसर सोबत येतो व अँड्राइड ११ वर आधारित OneUI ३.१ वर काम करतो. यामध्ये १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. Samsung Galaxy M42 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, ५ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि ५ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळते. फ्रंटला सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jvLeS1