नवी दिल्ली : लोकप्रिय टेक कंपनी पुढील महिन्यात इव्हेंटमध्ये अनेक शानदार प्रोडक्ट्स सादर करणार आहे. यात Samsung Galaxy Watch 4, आणि सारख्या डिव्हाइसचा समावेश आहे. वाचा: सॅमसंगच्या या स्मार्टवॉच आणि इयरबड्सची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. लाँचच्या आधीच सॅमसंगच्या या अपकमिंग प्रोडक्ट्सच्या संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. सॅमसंगच्या इव्हेंटध्ये Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 5G नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल स्मार्टफोन देखील लाँच केले जाण्याची शक्यता आहे. किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लाँचच्या आधीच My Smart Price ने गॅलेक्सी वॉच ४, सॅमसंग गॅलेक्सी वॉच ४ क्लासिक आणि सॅमसंग गॅलेक्सी बड्स २ ची संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्य लीक केली आहे. रिपोर्टनुसार, Samsung ला ४०एमएम आणि ४४एमएम राउंड शेप डायलसोबत सादर केले जाऊ शकते. ही स्मार्टवॉच ब्लॅक, सिल्वर आणि ग्रीन रंगात येईल. याची किंमत ३५० यूरो ते ४०० यूरो (जवळपास ३१ हजार ते ३६ हजार रुपये) असू शकते. वाचा: Samsung Galaxy Watch 4 Classic ला ४२mm, ४४mm आणि ४६mm डायल साइजमध्ये सादर केले जाऊ शकते. वॉचला ग्रे कलरमध्ये सादर केले जाईल. याची संभाव्य किंमत ४७० यूरो ते ५३० यूरो (जवळपास ४१ हजार रुपये ते ४७ हजार रुपये) असू शकते. तसेच, सॅमसंगचे नेक्स्ट जनरेशन Samsung Galaxy Buds 2 लला ब्लॅक, व्हाइट, ग्रीन आणि वॉयलेट रंगात लाँच केले जाऊ शकते. याची किंमत १६ हजार रुपये ते १८ हजार रुपये असेल. भारतात सॅमसंगच्या या इयरबड्स आणि स्मार्टवॉचची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hxx2FC