Full Width(True/False)

आधार कार्ड डाउनलोड करणे झाले खूपच सोपे, UIDAI ने शेअर केली ‘ही’ खास लिंक

नवी दिल्ली : किती महत्त्वाचे कागदपत्र आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. बँकेपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारची आवश्यक आहे. आता ने आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सोपी प्रक्रिया सुरू केली आहे. UIDAI ने एक लिंक जारी केली असून, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज आधार डाउनलोड करू शकता. तुम्ही कसे डाउनलोड करू शकता जाणून घेऊया. वाचा : या लिंकचा वापर करून डाउनलोड करा आधार UIDAI ने ट्विटरद्वारे एक डायरेक्ट लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही कधीही आधार कार्ड डाउनलोड करू शकता. eaadhaar.uidai.gov.in/ या लिंकचा तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी वापर करू शकता. वाचा : असे करा Aadhaar Card डाउनलोड
  • सर्वात आधी UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/19Jtw5g वर जा.
  • यानंतर वरच्या बाजूला तुम्ही आधार डाउनलोड करण्याचे तीन पर्याय मिळतील. पहिला पर्याय १२ आकडी आधार नंबर टाकण्याचा असेल, दुसरा एनरोलमेंट आयडी आणि तिसरा व्हर्च्यूअल आयडी टाकण्याचा असेल.
  • यापैकी कोणताही आयडी अथवा नंबर टाकून तुम्ही आधार कार्ड पुन्हा डाउनलोड करू शकता.
  • डिटेल भरल्यानंतर इमेजमध्ये देण्यात आलेले कॅरेक्टर्स टाइप करा आणि त्यानंतर Send वर क्लिक करा. वन-टाइम पासवर्ड आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर नंबर एसएमएसद्वारे मिळेल.
  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्डची माहिती आणि आधार डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
  • यानंतर डाउनलोड पर्यायावर क्लिक करून सेव्ह करा.
फोन अथवा लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. ई-आधार फॉर्मेटमध्ये डाउनलोड होतो. त्यामुळे सिस्टममध्ये पीडीएफ खोलण्याआधी फाइल सपोर्ट करणारे सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. याशिवाय ई-आधार डाउनलोड करण्याआधी पासवर्ड प्रोटेक्टेड असतो. उघडण्यासाठी खास पासवर्ड आवश्यक आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dAB9j7