नवी दिल्ली : आणि Vivo Y72 5G लवकरच भारतात लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी चे पोस्टर समोर आले होते. यात फोनच्या रॅम, डिस्प्ले आणि ऑफर्सविषयी माहिती समोर आली होती. आता नवीन लीकमध्ये फोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. तर Vivo V21 Series च्या प्रो मॉडेलची देखील किंमत समोर आली आहे. या दोन्ही फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: विवोचे हे दोन्ही फोन याच महिन्यात लाँच होणार आहे. रिपोर्टनुसार, स्मार्टफोनची किंमत जवळपास ३३,००० रुपये असेल. तर मिड रेंज ५जी फोन ची किंतम २३,००० रुपये असू शकते. V21 Pro, Vivo Y72 5G ची संभाव्य किंमत रिपोर्टनुसार, Vivo V21 Pro च्या सुरुवाती व्हेरिएंटची किंमत ३२,९९० रुपये असू शकते. कंपनीने एप्रिल महिन्यात विवो व्ही२१ स्मार्टफोनला भारतात सादर केले होते. याचे बेस मॉडेल ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीची किंमत २९,९९० रुपये आहे. दोन्ही फोन लूक आणि डिझाइनमध्ये समान आहेत. Vivo Y72 5G ची किंमत २२,९९० रुपये असू शकते, ही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची असेल. फोनला थायलंडमध्ये THB ९,९९९ (जवळपास २३,३०० रुपये) किंमतीत लाँच करण्यात आले आहे. मात्र, फोनचा लूक ग्लोबली लाँच झालेल्या मॉडेलपेक्षा वेगळा आहे. यात ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले मिळतो, जो ग्लोबल व्हेरिएंटमध्ये नाही. लाँच कधी ? रिपोर्टनुसार, Vivo V21 Pro 5G ला जुलैच्या अखेरीस लाँच केले जाऊ शकते. तर Vivo Y72 5G ला १५ जुलैला लाँच केले जाईल. हा फोन ग्रेफाइट ब्लॅक आणि ड्रीम ग्लो रंगात येतो. फोनमद्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले, ८ जीबी रॅम + ४ जीबी व्हर्च्यूल (एक्सटेंडेट) रॅम फीचर मिळेल. फोनमद्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. मात्र, कंपनीकडून दोन्ही फोनबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ACwvuB