Full Width(True/False)

तुमचे Whatsapp स्टेट्स धोक्यात?, कुणीही करू शकतो डाऊनलोड आणि कुणालाही पाठवू शकतो

नवी दिल्लीः आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जी स्टोरी व्हॉट्सअॅपला ठेवत आहात त्याची लाइफ फक्त २४ तास असते. परंतु, असे नाही. तुम्ही ज्या फिलिंग आणि इमोशनसोबत फोटोला पोस्ट केले आहे. त्याला व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट डाउनलोड करू शकता येते. तसेच कुणालाही पाठवता येऊ शकते. हे ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसला असेल. परंतु, हे आपोआप मोबाइलमध्ये डाउनलोड केले जाते. यासाठी समोरच्या व्यक्तीला काही करायचे नाही. जर तुम्ही कोणतीही व्हॉट्सअॅप स्टोरी पाहत असाल तर त्याला आपल्या फोनमध्ये पाहू शकता. वाचाः व्हॉट्सअॅप स्टोरी मध्ये जर तुम्ही कोणताही फोटो ओपन करून पाहिला तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये तो सेव्ह होतो. तुम्हाला तो डाउनलोड करायची गरज नाही. फक्त तुम्हाला हे शोधायचे आहे की, त्या फोटोला फोनमध्ये कुठे शोधायचे आहे. त्याची प्रक्रिया आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहोत. ६ स्टेप्स मध्ये तुम्ही याला पाहू शकता. वाचाः स्टेप बाय स्टेप जाणून घ्या, डाउनलोड झालेला फोटो स्टोर १. व्हॉट्सअॅप स्टोरीमध्ये जाऊन तुम्ही कोणाचा फोटो पाहा. २. त्यानंतर फाइल मॅनेजर मध्ये जा. त्यानंतर सेटिंग्सवर क्लिक करा. ३. सर्वात वरच्या हिडन फाइल्सला इनेबल करा. ४. फाइल मॅनेजर मध्ये व्हॉट्सअॅप फोल्डर ओपन करा. त्यानंतर मीडियावर जा. ५. या ठिकाणी Statuses नावाचे फोल्डर तुम्हाला दिसेल. त्याला ओपन करताच तुम्हाला आतापर्यंत पाहिलेली व्हॉट्सअॅप स्टोरीची फोटो दिसेल. त्याला तुम्ही कोणालाही सेंड करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dXGZuM