नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतात Mi अॅनिव्हर्सरी सेल आयोजित केला आहे. या सेलची सुरुवात १२ जुलै पासून सुरू होणार आहे. हा सेल १६ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. कंपनीला भारतात ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने हा सेल आयोजित केला आहे. वाचाः या सेलची घोषणा कंपनीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. मी इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून म्हटले की, मी चाहत्यांसाठी यावेळी ७ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने खास स्टाइलने आनंद साजरा केला जाणार आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. कंपनीने ट्विट मध्ये पुढे लिहिले की, एक्साइटिंग ऑफर्सचा फायदा उठवण्यासाठी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी प्राइस जिंकण्यासाठी १२ जुलै पासून मी अॅनिव्हर्सरी सेलसाठी तयार राहा. या अपकमिंग सेलसाठी कंपनीने एसबीआय सोबत पार्टनरशीप केली आहे. या पार्टनरशीप अंतर्गत ग्राहकांना डिस्काउंट दिला जाणार आहे. सेल दरम्यान एसबीआय क्रेडिट कार्ड होल्डर्संना ११ हजार रुपयांपर्यंत १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. वाचाः सेलमध्ये ग्राहकांना शाओमी डिव्हाइसला स्वस्त खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना सेल मध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट व्हियरेबल आणि अन्य डिव्हाइसवर डिस्काउंटचा फायदा मिळू शकणार आहे. सध्या शाओमीकडून सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्स संबंधी माहिती दिली नाही. या सोबतच कंपनीने ही सुद्धा घोषणा केली आहे की, भारतात ६५ वॉट फास्ट चार्जर लाँच करणार आहे. टीजर मधून ही माहिती समोर येत आहे की, चार्जर कॉम्पॅक्ट डिझाइन सोबत येऊ शकतो. कंपनीने म्हटले की, यात क्वॉलकॉम क्विक चार्ज ३.० चा सपोर्ट असणार आहे. सोबत यात यूएसबी टाइप सी केबल मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36roWsR