नवी दिल्ली : भारतीय बाजारात एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन्स लाँच होत आहे. यामध्ये जर तुम्ही खास ओप्पोचे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात चांगले पर्याय उपलब्ध आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला ६ जीबीपर्यंत रॅम ४ रियर कॅमेरे, ५ जी सपोर्ट आणि पॉवरफूल बॅटरी मिळेल. या फोन्सला तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्टसह ऑफलाइन बाजारातून खरेदी करू शकता. १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या स्मार्टफोन्सविषयी जाणून घेऊया. वाचा : ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ए५३ फोनमध्ये ६.५ इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. सोबतच फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची किंमत ११,९९० रुपये आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. बॅक पॅनेलवर तीन कॅमेरे दिले आहेत. यातील प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. वाचाः ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ओप्पो ए३३ मध्ये ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ५००० एएमएचची बॅटरी मिळते. फोन स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसरवर काम करतो. या फोनची किंमत ९,९९० रुपये आहे. यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. स्टोरेजला २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स ५जी स्मार्टफोन खरेदीची विचार असेल तर OPPO A53s 5G चा चांगला पर्याय आहे. या फोनमध्ये ६.५२ इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पॉवरसाठी यामध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट सपोर्टसह येतो. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोनची किंमत १५,९९० रुपये आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k4kp7W