नवी दिल्ली : फूड एग्रिगेटर झोमॅटोला लॉकडाउनच्या काळात मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळेल. झोमॅटोनुसार, या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची कामगिरी गेल्यावर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत चांगली आहे. आता कंपनी लवकरच अॅपवर एक ग्रोसरी सेक्शन सुरू करणार आहे. वाचाः झोमॅटोवरून खरेदी करण्यासाठी यूजर्सला ग्रोसरी सेक्शमध्ये जाऊन सुविधेनुसार स्टोर सिलेक्ट करावे लागेल व सामान कार्टमध्ये टाकून पेमेंट करावे लागेल. पैसे दिल्यानंतर सांगितलेल्या वेळेत आणि पत्त्यावर सामान पोहचेल. तुम्ही ज्याप्रमाणे झोमॅटोवरून जेवण मागवता, हे अगदी तसेच आहे. कंपनीने ग्रोसरी ई-टेलर ग्रोफर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. लाँच करणार झोमॅटो पुढील महिन्यात आयपीओ लाँच करणार आहे. कंपनीने मार्च महिन्यात गेल्या आर्थिक वर्षासाठी १,९९३ कोटी रुपयांचे ऑपरेटिंग रेवेन्यू नोंदवले होते. हे आधीच्या २,६०४ कोटी रुपयांच्या तुलनेत २३.५ टक्के कमी होते. यामुळे घट देखील २,३६२ कोटी रुपयांनी कमी होऊन ८२२ कोटी रुपये झाली आहे. खर्च ५ हजार कोटी रुपयांवरून थेट अर्धा होऊन २,६०८ रुपये झाला आहे. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अक्षत गोयल म्हणाले की, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत फूड डिलिव्हरी बिझनेसवर परिणाम झाला. सरफेस ड्रांसमिशनची भिती दूर झाली असून, गेल्या १८ महिन्यात फूड डिलिव्हरीच्या माध्मयातून ट्रांसमिशन झाल्याचे एकही प्रकरण समोरे आलेले नाही व कोट्यावधी ऑर्डर केल्या.’ महामारीच्या दरम्यान कंपनीची एव्हरेज ऑर्डर वॅल्यू (एओवी) वाढत आहे. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाही ही ३९५ रुपयांवर पोहचली आहे, जी एक वर्ष आधी २८७ रुपये होती. वाचाः ग्रोसरीवर बोलताना गोयल म्हणाले की, एक मोठी संधी आहे व सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आम्ही या क्षेत्रात सक्रियपणे प्रयोग करत आहोत व ग्रोफर्समध्ये भागीदारीसाठी १०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. आम्ही प्रायोगिक स्तरावर ग्रोसरी डिलिव्हरी मार्केटप्लेस सुरू करण्याच्या तयारीत आहोत. दरम्यान, २७ जुलैला झोमॅटोचे शेअर स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होती. याची किंमत ७२-७६ रुपये प्रति शेअर आहे. गुंतवणुकदारांची मागणी लक्षात घेता ऑफर साइजला ७५०० कोटी रुपयांनी वाढवून ९,३७५ कोटी केली आहे. झोमॅटोने म्हटले आहे की, गेल्यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत सरासरी २३ रुपये प्रति ऑर्डर मागे नफा कमवला. जे त्याच्या आधीच्या वर्षाच्या उणे ३०.५ रुपये मार्जिनपेक्षा चांगले आहे. तसेच, कमिशनमध्ये वाढ झाल्याने सरासरी प्रति ऑर्डर मागे पैसे कमवत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TRaYxO