नवी दिल्लीः भारतीय मोबाइल बाजारात खूप सारे स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु, भारतात फीचर फोनला सुद्धा जबरदस्त मागणी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर फोन संबंधी माहिती देत आहोत. ज्याची किंमत १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन मार्केट मध्ये तुम्हाला हे फीचर फोन १ हजार रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळतील. या आठवड्यात रियलमीच्या डिजो ब्रँडने आपले दोन नवीन फीचर फोन लाँच केले आहेत. याची सुरुवातीची किंमत १२९९ रुपये आहे. वाचाः लावा ए१ जोश फीचर फोन या फोनमध्ये १.८ इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले दिला आहे. सोबत ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनला ब्लॅक कलर मध्ये खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ४ एमबी रॅम दिले आहे. हे एक ड्युअल सिम फोन आहे. यात मेमरी कार्ड शिवाय, वेगळा स्लॉट दिला आहे. या फोनला ऑनलाइन सह ऑफलाइन मार्केट मधून खरेदी करू शकता. या फोनची किंमत ९५५ रुपये आहे. वाचाः आयटेल आयटी २१६३ फीचर फोन आयटेलचा हा फोन १.८ इंचाच्या डिस्प्ले सोबत येतो. यात १००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा फोन ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेज सोबत येतो. यात कंपनीने एससी६५३१ई प्रोसेसरचा वापर केला आहे. हा फोन एक ड्युअल सिम फोन आहे. ज्यात ३२ जीबी एसडी कार्ड दिले आहे. वाचाः कार्बन फीचर फोन कार्बनच्या या फोनमध्ये १.८ इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले दिला आहे. सोबत ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ३२ एमबी रॅम आणि ३२ एमबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनला फ्लिपकार्टवरून ८९० रुपयांत खरेदी करू शकता. वाचाः मायक्रोमॅक्स एक्स ३८१ फीचर फोन या फोनची किंमत ९१५ रुपये आहे. या फोनमध्ये १.७७ इंचाच डिस्प्ले दिला आहे. हा फोन ०.३ मेगापिक्सलच्या कॅमेरा सोबत येतो. या फोनमध्ये ३२ रॅम आणि ३२ एमबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. यात एसडी कार्ड दिले आहे. यात ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VglxL4