Full Width(True/False)

नवा 5G स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी या ५ गोष्टी विसरू नका, पाहा फोन कंपन्यांची 'चलाखी'

काही जबरदस्त 5G स्मार्टफोन्स लवकरच तुम्हाला बाजारात पाहायला मिळतील. अनेक नामांकित ब्रँड लवकरच नवीन 5G स्मार्टफोन बाजारात दाखल करणार आहेत. यात Realme GT 5G मालिका, सॅमसंग सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. अशात, जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर, काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे , तुम्हाला चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करण्यात मदत तर मिळेलच तसेच, 5G स्मार्टफोनच्या आवश्यकतेबद्दल माहिती प्रदान करेल. 5 जी तंत्रज्ञान अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करताना विशेष काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे. अन्यथा तुम्ही फसवणुकीचे शिकार होऊ शकता. आज आम्ही यासंबंधित महत्वाची माहिती तुमच्यासोबत शेयर करत आहो. जी तुम्हाला 5G फोन खरेदीच्या वेळी नक्कीच कामी येईल . पाहा डिटेल्स.

Battery Life
Battery Life

कमी बॅटरी लाईफ : 4G स्मार्टफोनच्या तुलनेत 5G स्मार्टफोन ओव्हरहिट आणि जलद डिस्चार्जच्या समस्येला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत, नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करताना, एखाद्याने फोनच्या बॅटरी आयुष्याबद्दल निश्चितपणे माहिती घ्यावी. 5G तंत्रज्ञानात, डेटा प्राप्त करताना अधिक बॅटरी वापरली जाते. अशा परिस्थितीत, मोठ्या बॅटरीसह 5G स्मार्टफोन खरेदी करणे हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असेल. 5G स्मार्टफोनमध्ये, सिग्नल प्राप्त करण्यासाठी ३ अतिरिक्त अँटेना प्रदान केले जातात.

5G Support Processor
5G Support Processor

5 सपोर्ट प्रोसेसर : 5G स्मार्टफोन खरेदी करतांना लक्षात ठेवण्यासाराखी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या 5G स्मार्टफोनसाठीही चांगला प्रोसेसर आवश्यक असतो. अशा परिस्थितीत, नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करताना, आपण घेत असलेला स्मार्टफोन समर्पित 5G प्रोसेसर सपोर्टसह येतो की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. ग्राहकांनी फक्त 5G प्रोसेसर सपोर्ट असलेले स्मार्टफोन खरेदी करावेत. अन्यथा इतर समस्यांना सामोरं जावं लागू शकते.

SUB-6GHz 5G Frequency
SUB-6GHz 5G Frequency

SUB-6GHz 5G फ्रिक्वेन्सी: भारतासारख्या देशात सध्या 5G नेटवर्क नाही. अशा स्थितीत mmWave रेडिओ फ्रिक्वेन्सी असलेला 5G स्मार्टफोन खरेदी करू नये. सब -6Ghz 5G फ्रिक्वेंसी सपोर्टसह स्मार्टफोन खरेदी करणे तुमच्यासाठी अधिक चांगले राहील. कारण, हे नेटवर्क अधिक कव्हरेज क्षेत्र प्रदान करतात. त्यांना मिड-रेंज बँड म्हणतात, जे प्रत्येक बाबतीत वापरण्यासाठी योग्य असतात. महत्वाचे म्हणजे, सॅमसंग गॅलेक्सी एस 10 5 जी सारखे फ्लॅगशिप फोन सब -6 जीएचझेड 5 जी ला सपोर्ट करत नाहीत.

No Single Band 5G Phone
No Single Band 5G Phone

सिंगल बँड 5G फोन खरेदी करू नका: 5G भारतात सुरुवातीच्या टप्प्यात आहे. स्मार्टफोन कंपन्यांना याची जाणीव आहे की, भारतात ५ जी नेटवर्क सुरू होण्यास बराच वेळ लागू शकतो. अशा स्थितीत काही कंपन्या सिंगल बँड 5G स्मार्टफोन ऑफर करत आहेत, जे भविष्यासाठी तयार नाहीत. याचा अर्थ असा होऊ शकतो की, एकच 5G बँड असलेल्या स्मार्टफोनला 4G सारखाच वेग मिळेल. अशा परिस्थितीत, हे लक्षात घेतले पाहिजे की, आपण खरेदी करत असलेला 5G स्मार्टफोन जास्तीत जास्त 5G बँडला समर्थन देतो.

Cost Of 5G Smartphone
Cost Of 5G Smartphone

5G फोन फार महाग तर नाही : सध्या 5G स्मार्टफोनची किंमत 4G फोनपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत, लक्षात ठेवा की तुम्ही खरेदी करत असलेला 5G स्मार्टफोन 4G पेक्षा वेगवान आहे की नाही? साधारणपणे 5G स्मार्टफोनची किंमत 4G पेक्षा दुप्पट असते. तसेच, 5G नेटवर्कच्या वापरासाठी महाग रिचार्जही महाग असतो. अशा परिस्थितीत, फक्त 5G बघून फोन खरेदी करू नका. 5G नंतर 4G पूर्णपणे बंद होईल असे नाही. भारतात 5G सोबत 4G सुरु राहणारच. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार च वेगवान गतीसाठी 5G फोन खरेदी करा.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lMm8zA