नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग लवकरच आपला सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G ला गॅलेक्सी A52चे अपडेट व्हर्जन म्हणून लाँच करणार आहे. या फोनला ५जी कनेक्टिविटी सोबत आणले जाणार आहे. Winfuture.de च्या माध्यमातून एका नवीन रिपोर्ट मध्ये हा दावा करण्यात आला आहे की, या फोनला ऑगस्ट महिन्यात आणले जाईल. रिपोर्ट मध्ये फोनची किंमत आणि फीचर्स संबंधी माहिती देण्यात आली आहे. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G मध्ये असू शकते हे फीचर्स सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G FHD प्लसच्या रिझॉल्यूशन सोबत ६.५ इंचाचा S-AMOLED पॅनेल सोबत येवू शकतो. एक ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिले जाणार आहे. ज्यात डिस्प्लेच्या वरच्या भागात पंच होल कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा सेल्फी स्नॅपर असेल. सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G चा कॅमेरा ऑप्टिक्स नुसार, सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G 64MP मुख्य सेन्सर सोबत 12MP अल्ट्रा-वाइड लेंस, 5MP मायक्रो लेंस आणि 5MP डेप्थ सेंसर क्वॉड कॅमेरा स्टॅक सोबत येईल. यात 4K व्हिडिओ सुद्धा घेता येईल. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जो सॅमसंग गॅलेक्सी A52 5G वर अपग्रेड असेल. ज्यात स्नॅपड्रॅगन 750G चिपसेट होता. 778G ला 8GB रॅम आणि128GB इंटरनल स्टोरेज सोबत जोडले जाईल. काही बाजारात 256GB व्हेरियंट सुद्धा मिळेल. वाचाः फोनची बॅटरी 4,500 एमएएचची असेल. जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. डिव्हाइस म्हणून Android 11 आधारित OneUI 3.1 ला आउट ऑफ द बॉक्स बूट करेल. A52s 5G मद्ये ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, NFC आणि एक USB-C पोर्टचा समावेश आहे. A52s 5G सुद्धा IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस रेटिंग सोबत येईल. सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G ची किंमत सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G ची किंमत युरोपच्या बाजारात ४४९ यूरो म्हणजेच जवळपास ३९ हजार रुपये असेल. या फोनला चार वेगवेगळ्या रंगात म्हणजेच निळ्या, काळ्या, हिरव्या आणि बैंगनी रंगात आणले जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xHyOKl