Full Width(True/False)

Airtel vs Jio vs Vi: २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे शानदार प्लान्स, मिळेल डेटा-कॉलिंग-एसएमएसची सुविधा

नवी दिल्ली : रिलायन्स आल्यानंतर टेलिकॉम कंपंन्या स्वस्त प्लान्स लाँच करत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ, आणि कम किंमतीत अधिक फायदे प्लान्स देणारे प्लान्स आणत आहे. या तिन्ही कंपन्यांकडे २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक शानदार प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी जाणून घेऊया. वाचा: रिलायन्स जिओचे २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान जिओकडे २५० रुपयांच्या आथील दोन प्लान्स आहे. याची किंमत १९९ रुपये आणि २४९ रुपये आहे. जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय कोणत्या नेटवर्कवर कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. जिओच्या २४९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिलतो. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते. याशिवाय दोन्ही प्लान्समध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. वोडाफोन आयडियाचे २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान वीआयच्या २४९ रुपयांच्या प्लान अंतर्गत दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, वीआय मूव्हीज आणि टीव्हीचा अ‍ॅक्सेस मिळेल. याशिवाय कंपनीकडे १९९ रुपयांचा प्लान आहे. यामध्ये दरररोज १ जीबी मिळतो. या प्लानची वैधता २४ दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, वीआय मूव्हीज आणि टीव्हीचा अ‍ॅक्सेस मिळेल. एअरटेलचा २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान एअरटेलच्या २४९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याची वैधता २८ दिवस असून, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच मनोरंजनासाठी Xstream आणि Wynk Music चा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. एअरटेलकडे १९९ रुपयांचा प्लान असून, यामध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २४ दिवस असून, प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, Airtel Xstream आणि Wynk Music चा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gPdsoT