Full Width(True/False)

ALERT! ‘या’ नंबरवरून कॉल आल्यास होऊ शकते मोठे नुकसान, चुकूनही करू नका रिसिव्ह

नवी दिल्ली : लोकांची आर्थिक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धती शोधत आहे. ईमेल, आणि एसएमएसद्वारे फ्रॉडच्या घटना वाढत असताना आंतरराष्ट्रीय कॉलच्या नावाखाली देखील फसवणूक करत आहेत. सरकारकडून सातत्याने सतर्क केले जात असले तरी अनेकजणांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. आता दूरसंचार विभागाने () देखील सर्व मोबाइल यूजर्सला मेसेज पाठवून या प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. वाचाः DoT द्वारे अनेक यूजर्सला मेसेज पाठवून आंतरराष्ट्रीय कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे. या मेसेजमध्ये लिहिले आहे की, तुमच्या फोनवर कोणत्याही नंबरशिवाय अथवा भारतीय नंबरवरून आल्यास DoT चा टोल फ्री क्रमांक १८००११०४२०/१९६३ वर त्वरित संपर्क करा. जर तुमच्या मोबाइलवर फोन येत असेल व नंबर दिसत नसेल तर तो फ्रॉड कॉल असू शकतो. DoT नुसार, असा फोन आल्यास त्वरित माहिती द्यावी. हे स्कॅम कॉल असतात व यापासून सावध राहायला हवे. जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या देखील नागरिकांना मेसेज पाठवून सावध करत असतात. आंतरराष्ट्रीय कॉल फ्रॉडबद्दल सांगायचे तर यूजर्सला वेगवेगळ्या कंट्री कोडद्वारे फोन येऊ शकतात. यात +९२, +३७५ इत्यादी कोडवरून कॉल येऊ शकतात. या कॉल्सला रिसिव्ह केल्यावर लॉटरी अथवा बक्षीस जिंकल्याचे सांगितल जाते. तसेच, कॉल केल्यानंतर तुमची खासगी माहिती विचारली जाते व बक्षीस घेण्यासाठी कमिशन मागितले जाते. अशाप्रकारची फसवणूक केवळ कॉलच नाही तर एसएमएसद्वारे देखील केली जाते. त्यामुळ आणि टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना सातत्याने सावध करत आहेत व अशाप्रकारच्या नंबरवर पुन्हा कॉल देखील करू नये. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xtcxzJ