नवी दिल्लीः लोकप्रिय लाइफस्टाइल ब्रँड ने आता भारतात स्मार्टवॉच बाजारात एन्ट्री घेतली आहे. होम डेकोर, फॅशन, अॅक्सेसरीज आणि पर्सनल केयर मध्ये आपल्या प्रोडक्ट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडने आता एक नवीन स्मार्टवॉच लाँच केली आहे. चुंबकने स्क्वॉड स्मार्टवॉच लाँच केली आहे. ही स्मार्टवॉच सहा यूनिक बँड डिझाइन आणि आरोग्य सुविधेसोबत येते. ज्यात हार्ट रेट सेन्सर, पीरियड्स ट्रॅकर, ब्लड मॉनिटर आणि खूप साऱ्या फीचर्सचा समावेश आहे. स्काड कंपनीकडून लाँच करण्यात आलेली ही पहिला स्मार्टवॉच आहे. याआधी चुंबककडे ग्राहकांसाठी स्वस्त किंमतीची नॉर्मल वॉचेस होत्या. वाचाः स्मार्टवॉच संबंधी सीईओ वसंत नांगियाने म्हटले की, आरोग्य आणि फिटनेस आमच्या ग्राहकासाठी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. आम्ही याला आणखी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहोत. स्काड स्मार्टवॉच त्या लोकांसाठी खास आहे. ज्यांनी स्वस्थ जीवनशैलीत आपले पहिले पाऊल ठेवले आहे. चुंबकने स्मार्टवॉचला मिलेनियल महिलांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन तयार केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फीचर्स पूर्णपणे त्यांच्या लाइफस्टाइलशी मिळते जुळते आहे. रियल टाइम आरोग्य अलर्ट सोबत फिटनेस आणि ऑक्सिजन ट्रॅकिंग, पीरियड्स सायकल, स्टेप काउंटर आणि अनेक खेळावर लक्ष ठेवले जाते. वाचाः Chumbak Squad स्मार्टवॉचची किंमत चुंबक स्क्वाड स्मार्टवॉचला भारतात ४ हजार ९९५ रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. स्मार्टवॉचला अॅमेझॉनवर तसेच चुंबकच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ब्रँड आपल्या स्टायलिश आणि रंगीन प्रोडक्ट्ससाठी ओळखले जाते. या स्मार्टवॉचला तुम्ही गुलाबी, निळ्या, आणि काळ्या रंगासोबत खरेदी करू शकता. वाचाः Chumbak Squad चे फीचर्स चुंबक स्क्वाड स्मार्टवॉच १.४ इंचाचा फुल टच एचडी डिस्प्ले दिला आहे. सहा वेगवेगळ्या बँड डिझाइन सोबत येते. वॉच १०० हून अधिक वॉच फेस सोबत येते. वॉच मध्ये एक इनबिल्ट ऑक्सिमीटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, पीरियड सायकल ट्रॅकर, झोपेवर नियंत्रणसह अनेक सुविधेचा समावेश आहे. हे हायड्रेशन अलर्ट पाठवू शकता. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी १४ दिवसांहून जास्त बॅटरी बॅक अप देते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VDUpFX