Full Width(True/False)

WhatsApp चे हे ३ नवीन फीचर्स बदलतील तुमच्या चॅटिंगची मजा, iOS आणि अँड्रॉयड दोन्ही करू शकतील वापर

नवी दिल्लीः आपल्या जबरदस्त फीचर्ससाठी जगभरात पॉप्युलर मेसेजिंग अॅप ने यावर्षी आपल्या युजर्संसाठी अनेक जबरदस्त फीचर्स रोलआउट करण्यात आले आहेत. यात View Once आणि Joinable calls सारख्या फीचर्सचा समावेश आहे. या फीचर्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फीचर्सचा वापर अँड्ऱॉयड आणि आयओएस युजर्स दोन्ही करू शकतील. याशिवाय, व्हॉट्सअॅप मध्ये लवकरच आणखी काही फीचर्स अपडेट केले जावू शकते. जाणून घ्या डिटेल्स या फीचर्स संबंधी. वाचा: View Once फीचर WhatsApp ने नुकतेच आपल्या युजर्ससाठी View Once फीचरला लाँच केले आहे. याच्या मदतीने या फीचर द्वारे पाठवण्यात आलेला फोटो किंवा व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर तो आपोआप गायब होईल. हे फीचर पासवर्ड सारखे तात्पुरते डिटेल्स सेंड करण्यासाठी फायदेशीर आहेत. वाचा: Joinable calls फीचर Joinable calls फीचरला कंपनीने गेल्या महिन्यात रोलआउट करण्यात आले आहे. कॉलिंगसाठी हे फीचर खूपच खास आहेत. याच्या मदतीने युजर्स कॉल सुरू झाल्यानंतर व्हाइस किंवा व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होवू शकतात. जर कोणताही ग्रुप कॉलिंगची सुरुवातीत कॉल ज्वाइन करू शकत नसतील तर या दरम्यान ते कॉल ज्वाइन करू शकतील. याआधी जर कोणत्याही ग्रुप कॉलमध्ये तुम्हाला कोणत्याही अन्य युजरला सहभागी करायचे असेल तर तुम्हाला कॉलला बंद करून कॉल स्टार्ट करावा लागत होता. वाचा: Chat Transfer फीचर या फीचरची अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. कंपनीने नुकतीच घोषणा केली होती की, तुम्ही iOS यूजर्स सहज आपली चॅट्स अँड्रॉयड डिव्हाइसवर ट्रान्सफर करू शकतील. याआधी चॅट हिस्ट्रीला एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये जाण्यासाठी कोणताही ऑप्शन नव्हता. परंतु, कंपनीने घोषणा केल्यानंतर अशा युजर्संना मोठा दिलासा मिळू शकतो. ज्यांना आयओएस वरून अँड्रॉयड डिव्हाइस युज करायचे आहे. वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zchb6O