मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नुकताच २९ वा वाढदिवस साजरा केला. मागच्या काही काळापासून सिद्धार्थ आणि कियारा यांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहेत. अशात कियाराच्या वाढदिवसांच्या निमित्तानं सिद्धार्थनं केलेली सोशल मीडियावर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. सिद्धार्थनं खास अंदाजात कियाराला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि लवकरच 'शेरशाह' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून या दोघांचं या चित्रपटातील गाणं 'रातां लंबियां' सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अशात या चित्रपटातील काही सीन्सच्या मदतीनं सिद्धार्थनं कियाराला रोमँटिक पण तेवढ्याच हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या गाण्यातील काही झलक शेअर केल्या आहेत आणि 'शेरशाह'च्या सेटवरील एक फोटो शेअर करत कियाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेटवर कॅमेऱ्यासोबत असलेल्या कियारासोबतचा फोटो शेअर करताना सिद्धार्थनं लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा कि (म्हणजे कियारा)तुझ्यासोबत शेरशाहचा प्रवास अप्रतिम आहे. या चित्रपटासोबत आपल्या अनेक आठवणी आहेत. नेहमीच उत्तम काम करत राहा. खूप सारं प्रेम.' सिद्धार्थनं कियारासोबतचे काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. ज्यात या दोघांची जोडी खुलून दिसत आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या मुख्य भूमिका असलेला शेरशाह हा चित्रपट १२ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. या चित्रपात सिद्धार्थ मल्होत्रा शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत तर अभिनेत्री कियारा आडवाणी विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपल चिमा यांची भूमिका साकारत आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. दोघंही अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. त्यामुळे हे दोघंही त्यांच्या नात्याची घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fB2a75