सध्या स्मार्टवॉच वापरण्याचा ट्रेंड आहे. लोक आता नियमित वापरत असलेल्या घड्याळांऐवजी स्मार्टवॉचला प्राधान्य देताना दिसत आहे. कारण, या वॉचमध्ये केवळ वेळच नाही, तर कॉलिंग फीचर्सपासून ते हेल्थ मॉनिटरिंग सारख्या अनेक गोष्टी उपलब्ध असतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेता कंपन्या देखील नवनवीन फीचर्ससह येणाऱ्या स्मार्टवॉच बाजारात आणत आहेत. अनेक स्मार्टवॉच या आता कॉलिंग फीचरसह येतात. यामुळे तुम्हाला फोनला खिश्यातून वारंवार बाहेर काढण्याची गरज पडत नाही. तुम्ही जर कॉलिंग फीचरसह येणारी स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या काही पर्यायांबाबत माहिती देत आहोत. यामध्ये तुम्हाला Realme Watch S, Realme Watch, Fire-Boltt Beast, Noise NoiseFit Active, Fire-Boltt Talk, Noise ColorFit Nav, Amazfit BIP S आणि Fitbit Versa Lite Edition सारख्या स्मार्टवॉच मिळतील. या स्मार्टवॉचविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Realme Watch S
या वॉचमध्ये १.३ इंच डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन ३६०x३६० पिक्सल आहे. वॉचमध्ये अॅल्यूमिनियम बॉडी आणि सिलिकॉन स्ट्रॅफ देण्यात आली आहे. यामध्ये गोरिल्ला ग्लास, वॉटरप्रूफ, कॉल रिसिव्ह, फिटनेस ट्रॅकिंग सारखे फीचर्स मिळतील. १५ दिवस बॅटरी बॅकअपसह येणाऱ्या या वॉचची किंमत ४,९९९ रुपये आहे.
Realme Watch
या स्मार्टवॉचमध्ये १.४ इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन ३२०x३२० पिक्सल आहे. यामध्ये देखील गोरिल्ला ग्लास, वॉटरप्रूफ, कॉल रिसिव्ह, फिटनेस ट्रॅकिंगसारखे फीचर्स मिळतील. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी २० दिवस टिकते. सिलिकॉम स्ट्रॅपसह येणाऱ्या या वॉचची किंमत २,२९९ रुपये आहे.
Fire-Boltt Beast
Fire-Boltt Beast या स्मार्टवॉचमध्ये १.६९ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन ३६०x३६० पिक्सल आहे. या वॉचमध्ये रेक्टँग्यूलर डिझाइन, फ्लॅट डायल आणि सिलिकॉन स्ट्रॅप देण्यात आली आहे. फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास, वॉटरप्रूफ, कॉल रिसिव्ह, फिटनेस ट्रॅकिंग मिळेल. सिंगल चार्जमध्ये या स्मार्टवॉचची बॅटरी जवळपास ८ दिवस टिकते. दमदार फीचर्ससह येणाऱ्या Fire-Boltt Beast या स्मार्टवॉचला तुम्ही फक्त ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
NoiseFit Active
या वॉचमध्ये वॉटरप्रूफ, कॉल रिसिव्ह आणि फिटनेस ट्रॅकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये १.२८ इंच TFT LCD डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x२४० पिक्सल आहे. वॉचमध्ये ३२०एमएएचची Li-Polymer बॅटरी देण्यात आली असून, जी सिंगल चार्जमध्ये ७ दिवस टिकते. या वॉचची किंमत ३,९९९ रुपये आहे.
Fire-Boltt Talk
या स्मार्टवॉचमध्ये १.२८ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x२४० पिक्सल आहे. वॉचमध्ये कॉल रिसिव्ह आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स मिळेल. वॉचमध्ये स्टील बॉडी आणि सिलिकॉन स्ट्रॅप देण्यात आली आहे. ८ दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येणाऱ्या या वॉचला तुम्ही ४,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
Noise ColorFit Nav
Noise ColorFit Nav स्मार्टवॉचमध्ये १.४ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन ३२०x३२० पिक्सल आहे. यामध्ये वॉटरप्रूफ, कॉल रिसिव्ह आणि फिटनेस ट्रॅकिंगसारखे शानदार फीचर्स मिळतील. वॉचमध्ये रेक्टँग्यूलर डिझाइन, फ्लॅट डायल, पॉलिकार्बोनेट बॉडी आणि सिलिकॉन स्ट्रॅप देण्यात आली आहे. वॉचमध्ये १८० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, सिंगल चार्जमध्ये ४ दिवस टिकते. शानदार फीचर्ससह येणाऱ्या Noise ColorFit Nav या वॉचची किंमत ४,४९९ रुपये आहे.
Amazfit BIP S
या स्मार्टवॉचमध्ये १.२८ इंच टीएफटी डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १७६x१७६ पिक्सल आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास, कॉल रिसिव्ह, फिटनेस ट्रॅकिंग सारखे फीचर्स मिळतील. यात सिलिकॉन स्ट्रॅप आणि पॉली कार्बोनेट बॉडी देण्यात आली आहे. यात देण्यात आलेली २०० एमएएचची बॅटरी ४० दिवस टिकते. वॉचची किंमत ३,९९९ रुपये आहे.
Fitbit Versa Lite Edition
वॉचमध्ये १.२८ इंचाचा PMOLED डिस्प्ले मिळतो. यात देखील फिटनेस ट्रॅकिंग आणि कॉल रिसिव्ह फीचर्स देण्यात आले असून, वॉच वॉटरप्रूफ आहे. यात रेक्टँग्यूलर डिझाइन, कर्व्ड डायल, रबर स्ट्रॅप आणि अॅल्यूमिनियम बॉडी मिळतो. ५ दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येणाऱ्या या वॉचची किंमत ४,८०० रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ATLXBW