मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलनं अलिकडच्याच काळात बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटांमध्ये कमबॅक केलं आहे. मागच्याच महिन्यात तिचा लघुपट एक दुवा ऑनलाइन रिलीज झाला होता. या चित्रपटात ईशा देओलनं एका मुस्लीम महिलेची भूमिका साकारली आहे. मागच्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये दिसली नसली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकत्याच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ईशा देओलनं तिच्या कमरेवर असलेल्या टॅटूबाबत खुलासा केला आहे. ईशानं तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. ज्यात तिच्या कमरेवर एका मोठा टॅटू अर्धवट दिसत आहे. या फोटोमध्ये ईशा व्हाइट जीन्स आणि पिंक स्वेटशर्टमध्ये दिसत असून तिच्या कमरेवरील टॅटूचा काही भाग सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो शेअर करताना ईशानं लिहिलं, 'हो, तुमचा अंदाज बरोबर आहे. हा खरा टॅटू आहे आणि मी तो २००९ साली गोंदवून घेतला होता.' धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी लेक ईशा देओलनं २००२ साली 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 'युवा', 'धूम', 'दस', 'नो एंट्री' अशा काही सुपरहीट चित्रपटांमध्ये झळकली होती. २०१२ साली ईशा देओलनं बॉयफ्रेंड भारत तख्तानी याच्याशी लग्न केलं आणि या दोघांना आता राध्या आणि मिराया अशा दोन मुली आहेत. त्यानंतर आता ईशानं अभिनय क्षेत्रात पुन्हा कमबॅक केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yyUNnU