Full Width(True/False)

Xiaomi ने लाँच केले दोन दमदार टॅबलेट्स, ८६००mAh बॅटरीसह मिळेल ५०MP कॅमेरा

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी ने दोन नवीन टॅबलेट्स लाँच केले आहेत. आणि सोबतच कंपनीने Mi Mix 4 आणि Mi TV OLED रेंज देखील सादर केली आहे. मध्ये ११ इंचाची मोठी स्क्रीन, डॉल्बी एटमॉससह जास्त क्षमतेची बॅटरी दिली आहे. विषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Mi Pad 5 स्पेसिफिकेशन्स सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले: Mi Pad 5 मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ११ इंच २.५के ट्रूटोन डिस्प्ले मिळतो, जो एचडीआर १० आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतो. हा डिव्हाइस अँड्राइड ११ वर आधारित MIUI वर काम करतो. प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon ८६० SoC सोबत ६ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल, कनेक्टिव्हिटी: Xiaomi Tablet मध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टसोबत चार स्पीकर्स देण्यात आले आहेत. कॅमेरा: Mi Pad 5 च्या रियरला एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. बॅटरी: टॅबलेटमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ८७२० एमएएचची बॅटरी मिळते. Mi Pad 5 ची किंमत: टॅबलेटच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY १,९९९ (जवळपास २२,९०० रुपये), तर ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २२९९ (जवळपास २६,४०० रुपये) आहे. स्पेसिफिकेशन्स सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले: यामध्ये देखील १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ११ इंच २.५के ट्रूटोन स्क्रीन देण्यात आली आहे, जी डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर १० सपोर्टसह येते. टॅब अँड्राइड ११ आधारित MIUI वर काम करतो. प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात Qualcomm Snapdragon ८७६० SoC सह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. कॅमेरा: Mi Pad 5 Pro च्या ५जी व्हेरिएंटमध्ये रियरला ५० मेगापिक्सल कॅमेरा, तर वाय-फाय व्हेरिएंटमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये ५ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेंसर देखील मिळेल. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. कनेक्टिव्हिटी: Xiaomi ब्रँडच्या या डिव्हाइसमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टसह ८ स्पीकर्स देण्यात आले आहेत. बॅटरी: यामध्ये ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ८६००एमएएचची बॅटरी मिळते. Mi Pad 5 Pro ची किंमत एमआय पॅड ५ प्रोच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २४९९ (जवळपास २८,७०० रुपये), ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २,७९९ (जवळपास ३२,१०० रुपये) आणि ८ जीबी रॅम व २५६ जीबी टॉप व्हेरिएंटची किंमत CNY ३,४९९ (जवळपास ४०,१०० रुपये) आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fRyqmp