Full Width(True/False)

... म्हणून अमिताभ बच्चन यांनी मानधन न घेताच केला होता 'ब्लॅक'

मुंबई- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चेहरे' चित्रपटात बॉलिवूडचे महानायक यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटासाठी अमिताभ यांनी कोणतंही मानधन आकारलं नाही. अमिताभ 'चेहरे' चित्रपटाच्या कथेने इतके प्रभावित झाले की त्यांनी मानधन न घेता चित्रपट पूर्ण केला. इतकंच नाही तर चित्रपटासाठी पोलंडमध्ये झालेला स्वतःचा सगळा खर्च देखील स्वतः केला. हे पहिल्यांदाच नाहीये जेव्हा अमिताभ यांनी मानधन न घेता चित्रपट केला. यापूर्वी लोकप्रिय दिग्दर्शक यांच्या '' चित्रपटासाठीही अमिताभ यांनी कोणतंही मानधन घेतलं नव्हतं. 'ब्लॅक' चित्रपटात अमिताभ यांनी एका मूक- बधिर मुलीच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री राणी मुखर्जी त्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेसाठी अमिताभ यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. या चित्रपटासाठी मानधन न घेण्याचं एकमेव कारण होते संजय लीला भन्साळी. अमिताभ संजय यांचे चित्रपट पाहून प्रचंड उत्साहित झाले. अमिताभ यांना संजय यांच्यासोबत काम करण्याची तीव्र इच्छा होती. या इच्छेखातर चित्रपटासाठी कोणतंही मानधन घेणं त्यांनी नाकारलं. या गोष्टीचा खुलासा स्वतः अमिताभ यांनी केला होता. 'ब्लॅक' चित्रपटाला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी लिहिलं, 'संजय लीला भन्साळी यांचं काम पाहून मी इतका प्रभावित झालो की मला त्यांच्यासोबत काम करावंसं वाटू लागलं. जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा मी कोणतंही मानधन घेतलं नाही. अशा प्रकारच्या चित्रपटाचा भाग असणं माझ्यासाठी सर्वकाही होतं. चित्रपटाच्या प्रीमियरच्या दिवशी जेव्हा आम्ही हा चित्रपट पाहिला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. प्रेक्षकांमध्ये अभिनेते दिलीप कुमार बसले होते. हे माझ्यासाठी बालपणीच स्वप्न पूर्ण होण्यासारखं होतं.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DBuTD9