नवी दिल्ली : FFALCON ने Thunderbird FF1 चीनमध्ये लाँच केला आहे. स्वतंत्रपणे बनवलेल्या या मिड-रेंज फोनला हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, ६४ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि २५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज सारखी सुविधा देण्यात आली आहे. जाणून घ्या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स बद्दल सविस्तर. वाचा: FFALCON थंडरबर्ड FF1: किंमत आणि उपलब्धता FFALCON थंडरबर्ड FF1 च्या १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,४९९ युआन म्हणजेच २६ हजार ३०० रुपये आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,८९९ युआन म्हणजेच ३१ हजार ६०० रुपये किंमत आहे. चीनमध्ये १० सप्टेंबरपासून या फोनची विक्री सुरू होईल. हँडसेट चीन वगळता इतर बाजारात लाँच केला जाणार की नाही हे सध्या स्पष्ट नाही. FFALCON थंडरबर्ड FF1: वैशिष्ट्ये FFALCON थंडरबर्ड FF1 मध्ये ६.६७ इंचाचा IPS LCD पॅनल आहे जो फुल HD रिझोल्यूशनसह आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २० :९ आहे आणि रिफ्रेश रेट १२० Hz आहे. डिस्प्लेवरील पंच-होल कटआउटमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. FFALCON थंडरबर्ड FF1 स्मार्टफोन मागील बाजूला चौरस आकाराचे कॅमेरा मॉड्यूल असून मागील बाजूला ६४ मेगापिक्सेल प्राथमिक, ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सेल डेप्थ असिस्ट लेन्स अपर्चर एफ / १.७ सह देण्यात आले आहेत. हँडसेट Android ११ OS सह येतो. FF1 मध्ये Dimensity ९०० चिपसेट आणि ८ GB रॅम देण्यात आली आहे. हा फोन १२८ जीबी आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेजसह येतो. फोनमध्ये ४३०० mAh ची बॅटरी आहे जी ६६ W जलद चार्जिंग तंत्रज्ञानाला समर्थन देते. हँडसेटमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, 5 जी/4 जी, वाय-फाय ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५.१, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3js9TXo