Full Width(True/False)

चीनमध्ये धुमाकूळ घातलेला रियलमीचा हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः आणि GT मास्टर एडिशन १८ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहेत. यानंतर फ्लिपकार्टवरून या फोनची विक्री करण्यात येईल. Realme चे सीईओ माधव शेठ यांनी १८ ऑगस्टला YouTube वर AskMadhav मध्ये भारतात लाँच होण्याचे संकेत दिले होते. कंपनीने आता अधिकृत पणे फ्लिपकार्टवर आपली लिस्टिंगवरून दोन डिव्हाइसच्या तारखेची माहितीला होकार दिला आहे. वाचाः Realme GT 5G आणि GT Master Edition चे फीचर्स Realme GT 5G क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट सोबत येते. तर GT मास्टर व्हेरियंट स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट द्वारा असेल. Realme GT मास्टर एडिशन 7GB व्हर्च्युअल रॅम सोबत १२ जीबी पर्यंत रॅम पॅक करतो. रॅम आणि इंटरनल स्टोरेजमध्ये दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. बेस मॉडल मध्ये 8GB RAM/128GB इंटरनल स्टोरेज आहे. तर दुसरे 12GB RAM/256GB इंटरनल स्टोरेज आहे. स्मार्टफोन रियलमी यूआय २.० सोबत अँड्रॉयड ११ वर काम करतो. वाचाः GT Master Edition चा कॅमेरा या फोनमध्ये फ्रंट फेसिंग आणि रियर कॅमेरा सिस्टम मध्ये 32MP चा फ्रंट कॅमरा, 64MP चा रियर कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2MP चा मायक्रो कॅमेराचा समावेश आहे. एक इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्पीकर आणि 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. Realme GT Master Edition मध्ये 4,300mAh/4,200mAh बॅटरी दिली आहे. 65W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. वाचाः Realme GT 5G चा कॅमेरा Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा Realme UI 2.0 सोबत Android 11 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. हा क्वॉड कॅमेरा सेटअप सोबत येतो. ज्यात 64MP चा प्रायमरी सेंसर, 8MP चा अल्ट्रा-वाइड सेंसर, 2MP चा मायक्रो आणि 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः सर्वात आधी चीनमध्ये लाँच झाला होता Realme GT 5G Realme GT 5G ला सर्वात आधी चीनमध्ये मार्च महिन्यात लाँच करण्यात आले होते. यूरोप मध्ये या फोनला जून महिन्यात लाँच केले होते. Realme GT 5G च्या इंडिया एडिशन मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lWfx5B