Full Width(True/False)

महिन्याला करू शकता १२ रेल्वे तिकिटं बुक, फक्त करावे लागेल हे काम; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : बुक करण्यासाठी अनेकजण ऑनलाइन पोर्टलचा वापर करतात. मात्र, च्या नियमानुसार, एका यूजर आयडीवरून महिन्याला केवळ ६ तिकिट बुक करू शकता. मात्र, तुम्ही महिन्याला १२ तिकिट देखील बुक करू शकता. यासाठी तुमच्या आधार नंबरला अकाउंटसोबत लिंक करावे लागेल. तुम्ही जर महिन्याला फक्त सहा तिकिटे बुक करत असाल तर व्हेरिफिकेशन करायची गरज नाही. वाचा: महिन्याला ६ पेक्षा अधिक तिकिट बुक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा IRCTC रजिस्टर्ड यूजरला My Profile पर्यायावर जाऊन KYC ऑप्शनद्वारे आधार व्हेरिफाय करावे लागेल. यूजरला आधार व्हेरिफाय करण्यासाठी आधारसोबत रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर यूजरचे आधार व्हेरिफाइड होईल. याशिवाय महिन्याला ६ पेक्षा अधिक तिकिट बुक करणार असाल तर एका पेसेंजरला देखील आधार व्हेरिफाइड करावे लागेल. यूजर्सला संभाव्या प्रवाशांना त्यांच्या आधार नंबरसोबत व्हेरिफाय करण्याची गरज असते व त्यांना मास्टर लिस्टमध्ये अ‍ॅड करावे लागते. तुम्हाला जर महिन्याला सहापेक्षा अधिक तिकिट बुक करायचे असतील तर ही प्रक्रिया आधीच करून घ्या. यूजर्स तिकिट बुक करताना या आधार व्हेरिफाइड प्रवाशांना थेट मास्टर लिस्टमध्ये अ‍ॅड करू शकतात. असे करा आधार IRCTC अकाउंटशी लिंक
  • सर्वात प्रथम www.irctc.co.in साइटवर लॉगइन करा.
  • यानंतर MY Account टॅबमध्ये Your Aadhaar लिंक सिलेक्ट करा.
  • आता तुमच्यासमोर Aadhaar KYC पेज उघडेल. येथे आधार कार्डनुसार तुमचे नाव, आधार नंबर, व्हर्च्यूअल आयडी टाका. त्यानंतर चेक बॉक्स सिलेक्ट करून Send OTP बटनावर क्लिक करा.
  • आता रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
  • KYC रिस्पॉन्स आधारशी फेच होईल. यानंतर Update बटनवर क्लिक करून आधार व्हेरिफिकेशन प्रोसेसर पूर्ण करा.
  • यानंतर कन्फर्मेशन मेसेजसोबत पॉप-अप विंडो उघडेल. आता विंडो बंद करा व वर पुन्हा लॉग इन करा.
  • IRCTC च्या वेबसाइटवर सर्वात वरती My Account टॅबमध्ये जाऊन जाकर Link Your Aadhaar लिंक सिलेक्ट करा. येथे Aadhaar KYC स्टेट्स तपासू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jzRCWJ