मुंबई- बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करतोय. शाहरुखचे चाहते त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. आज शाहरुख यशाच्या शिखरावर आहे परंतु, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी शाहरुखने प्रचंड मेहनत केली आहे. शाहरुखला या क्षेत्रात यश मिळणार ही भविष्यवाणी यापूर्वीच केली गेली होती हे तुम्हाला ठाऊक आहे का? शाहरुखने स्वतः या घटनेचा खुलासा 'हॅपी न्यू इअर' चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात केला होता. शाहरुखचे पैसे चोरीला गेले होते परंतु, त्याबदल्यात फकीर बाबांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. 'हॅपी न्यू इअर' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहरुखने दीपिका पादुकोण सोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्या घटनेचा खुलासा करत शाहरुख म्हणाला, 'ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मी माझ्या आईसोबत अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी गेलो होतो. तेव्हा माझ्याजवळचे ५ हजार रुपये चोरीला गेले. ते पैसे मला आईने सांभाळून ठेवायला दिले होते. मी सगळीकडे शोधले पण पैसे नाही मिळाले. तेव्हा तिथे एक फकीर बाबा आले. त्यांनी मला विचारलं, काही हरवलंय का? मी म्हणालो, हो. त्यावर त्यांनी पुन्हा विचारलं, ५ हजार रुपये हरवलेत?' शाहरुख पुढे म्हणाला, 'मी अविश्वासाने त्यांच्याकडे पाहातच राहिलो. मी विचारात पडलो की यांना कसं कळलं. मी त्यांना हो म्हटलं. मग ते म्हणाले की, 'इथे आलायस तर रिकाम्या हाताने परत नाही जाणार. ५ हजार गमावलेस, ५०० कोटी कमावशील.' माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. आपण सगळे शिकलेले आहोत पण जेव्हा तुमच्यासोबत असं काही घडतं तेव्हा अशा गोष्टींवर तुमचा पण विश्वास बसतो. अजमेर शरीफची माझ्यावर कृपा आहे. मला पैशांबद्दल काही वाटत नाही पण मी खूप नाव कमावलं. मी खूप चांगल्या गोष्टी मिळवल्या आणि मी तर आईच्या आशीर्वादासाठी गेलो होतो. आज आई नाहीये पण तिचा आशीर्वाद आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Cw6YEf