Full Width(True/False)

आज भारतात लाँच होणार रेडमीचा पहिला लॅपटॉप, मिळणार दमदार फीचर्स

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आज भारतात लॅपटॉपला लाँच करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, लॅपटॉपमध्ये ११th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर मिळेल. याशिवाय लॅपटॉपमध्ये फुल एचडी डिस्प्ले दिला जाईल. कंपनीने अद्याप या सीरिजचे किती व्हर्जन लाँच केले जातील याची माहिती दिलेली नाही. मात्र, लॅपटॉपचे दोन व्हर्जन सादर केले जाण्याची शक्यता आहे. रेडमीबुक १५ ची संभाव्य किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया. वाचा: RedmiBook 15 ची संभाव्य किंमत: भारतीय बाजारात या लॅपटॉपची किंमत जवळपास ५० हजार रुपये असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीच्या टीझरवरून हा चारकोल ग्रे रंगात उपलब्ध होईल. गेल्या अनेक दिवसांपासून हा लॅपटॉप चर्चेत आहे. आज अखेर कंपनीकडून लाँच केला जाणार आहे. RedmiBook 15 चे संभाव्य फीचर्स: रेडमीबुक १५ मध्ये १५.६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यामध्ये ११ th जनरेशन इंटेल कोर आय३ आणि कोरआय५ प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम मिळू शकते व स्टोरेजमध्ये २५६ जीबी आणि ५१२ जीबी असे दोन व्हेरिएंट सादर केले जाऊ शकतात. लॅपटॉप विंडोज १० वर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्यूल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ वी५.० सोबत यूएसबी ३.१ टाइप-सी, यूएसबी टाइप-ए, यूएसबी २.०, एचडीएमआय आणि ऑडिओ जॅक सारखे फीचर्स मिळतील. यात ६५ वॉट चार्जर दिला जाऊ शकतो. बॅटरीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VrNAHA