नवी दिल्ली: Vivo चा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो आणि आता अधिकृत लाँच होण्यापूर्वी या Vivo मोबाईल फोनची किंमत समोर आली आहे. ९१ मोबाईल्सच्या अहवालात आगामी Vivo Y53s च्या किंमती विषयी माहिती मिळाली आहे. ९१ मोबाईलच्या अहवालानुसार, भारतीय बाजारात या आगामी Vivo मोबाईल फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २२,९९० रुपये (१९,४९० रुपये एमओपी) असू शकते. वाचा: ९१ मोबाईल्सना या आगामी Vivo स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती ऑफलाइन रिटेल स्रोतांकडून मिळाली आहे. हा फोन आणि डीप सी ब्लू या दोन कलर व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. Vivo Y53s फोन व्हिएतनाम आणि चायनीज मार्केट मध्ये आधीच लाँच करण्यात आले असल्यामुळे फोनची वैशिष्ट्ये आधीच सर्वांना माहित आहेत. Vivo Y53s : वैशिष्ट्ये सॉफ्टवेअर: Vivo फोन अँड्रॉइड ११ वर आधारित फनटच ओएस सह लाँच केला जाऊ शकतो. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी ८ जीबी रॅम (चांगल्या मल्टीटास्किंगसाठी ३ जीबी व्हर्च्युअल रॅम) आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मीडियाटेक हेलियो जी ८० एसओसीसह दिले जाऊ शकते. मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज वाढवणे शक्य आहे. डिस्प्ले: फोनमध्ये ६.५८ इंच FHD + LCD पॅनल दिले जाऊ शकते. कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-बँड वाय-फाय, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ४ जी एलटीई, ब्लूटूथ व्हर्जन ५.० आणि जीपीएस सपोर्ट मिळू शकतो. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो. बॅटरी: फोनला पावर देण्यासाठी ५००० mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा: फोनच्या बॅक पॅनलवर तीन रियर कॅमेरे दिले जाऊ शकतात. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर Vivo Y53sमध्ये दिला जाऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3llF08h