Full Width(True/False)

गुगलकडून 'या' ८ धोकादायक अॅप्सवर बंदी, तुम्हीही तात्काळ डिलीट करा

नवी दिल्लीः सध्या क्रिप्टोकरंसी म्हणजेच एक प्रकारची डिजिटल कॅश प्रणाली खूप पॉप्यूलर होत आहे. अनेक लोक बिटकॉइन सारखी क्रिप्टोकरंसी मध्ये गुंतवणूक करीत आहेत. काही यासंबंधी माहिती करून घेत आहेत. परंतु, अनेक जण याचा गैरफायदा घेत आहेत. क्रिप्टोकरंसीच्या नावाने अनेकांची फसवणूक करीत आहेत. याच पद्धतीचे काही धोकादायक स्मार्टफोनमधील अॅप्स समोर आले आहेत. गुगलने अशाच ८ अॅप्सवर बंदी घातली आहे. जे क्रिप्टोकरंसीच्या नावावर लोकांची फसवणूक करीत होते. जाणून घ्या डिटेल्स. वाचा: सिक्योरिटी फर्म Trend Micro च्या रिपोर्टच्या माहितीनुसार, तपास केल्यानंतर हे ८ धोकादायक अप्स जाहिरात दाखवून आणि सब्सक्रिप्शन सर्विसचा चार्ज घेवून साधारण ११०० रुपये महिना आणि अतिरिक्त चार्ज आकारून युजर्संना चुना लावत होते. ट्रेंड मायक्रो ने यासंबंधी माहिती गुगल प्ले ला दिली होती. यानंतर त्या अॅप्स ला प्ले स्टोरवरून हटवले आहे. परंतु, प्ले स्टोरवरून हटवल्यानंतर तुम्ही जर याला डाउनलोड केले असेल तर हे अॅप्स अजूनही काम करू शकतात. त्यामुळे तुम्ही ते तात्काळ डिलीट करा. वाचा: गुगल प्ले स्टोरवरून हटवलेल्या धोकादायक अॅप्सची लिस्ट BitFunds – Crypto Cloud Mining Bitcoin Miner – Cloud Mining Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet Crypto Holic – Bitcoin Cloud Mining Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System Bitcoin 2021 MineBit Pro - Crypto Cloud Mining & btc miner Ethereum (ETH) - Pool Mining Cloud रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, १२० हून जास्त नकली क्रिप्टोकरंसी अॅप्स अजूनही ऑनलाइन उपलब्ध आहेत. कंपनीने एका ब्लॉगमध्ये लिहिले की, क्रिप्टोकरंसी मायनिंगच्या नावाने लोकांना धोका देणारे हे अॅप्स जाहिराती दाखवत होते. या अॅप्सने जुलै २०२० पासून २०२१ पर्यंत जगभरात ४५०० हून जास्त युजर्संना टार्गेट केले आहे. वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D6wv7r