Full Width(True/False)

अखेर अरुंधती- अनिरुद्ध वेगळे होणार, पुढील कथानकाची उत्सुकता

मुंबई- फार कमी वेळात प्रचंड गाजणारी आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी मालिका '' पुन्हा एकदा टीआरपीमध्ये वरचढ ठरली आहे. मालिकेत येणारे निरनिराळे ट्विस्ट, खिळवून ठेवणारं कथानक, उत्कृष्ट संवाद आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यांच्या जोरावर मालिका प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यास यशस्वी ठरली आहे. परंतु, वाहिनीतर्फे दाखवण्यात येणाऱ्या प्रोमोनुसार अखेर अरुंधती आणि अनिरुद्ध घटस्फोट घेणार आहेत. हे पाहून मात्र प्रेक्षकांना वाईट वाटलं आहे. त्यासोबतच आता पुढे काय? ही उत्सुकतादेखील प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय. वाहिनीवर दाखवण्यात आल्याप्रमाणे, अखेर न्यायालयाने अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली आहे. त्यानंतर अरुंधती तिचं मंगळसूत्र काढून अनिरुद्धच्या हातावर ठेवून निघून जाते. हे पाहून प्रेक्षकांनी वाईट वाटल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अरुंधतीसोबत असं व्हायला नको होतं, काहीतरी होऊन अरुंधती आपला निर्णय बदलेल, अशी पुसटशी आशा प्रेक्षकांच्या मनात होती. परंतु, तसं न घडता अरुंधती आणि अनिरुद्ध वेगळे होणार आहेत. आता पुढे मालिकेत नक्की काय दाखवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिकेच्या कथानकाप्रमाणे, अरुंधती घटस्फोटानंतर तिच्या माहेरी निघून जाणार आहे. त्यानंतर अनिरुद्ध संजनासोबत लग्न करणार का आणि संजना अनिरुद्धसोबत त्याच्या घरात राहायला येणार का, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहे. तर दुसरीकडे यश आणि गौरीचा साखरपूडा झाला परंतु, त्यांच्या लग्नात काही अडथळे येणार का? सोबतच अभि आणि अनघा यांच्यातील नातं परत जुळणार का? झालं गेलं विसरून अनघा अभिशी लग्न करायला तयार होईल का? अरुंधती निघून गेल्यानंतर संपूर्ण घर कोण सांभाळणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या घटस्फोटानंतरचं कथानक नक्की काय असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lh7mR5