Full Width(True/False)

अभिनेत्री मंदिरा बेदीनं शेअर केला हसरा फोटो, म्हणाली..

मुंबई : अभिनेत्री पती राज कौशल यांच्या निधनाच्या दुःखातून हळूहळू सावरत आहे. हळूहळू तिचे आयुष्य सुरळीत करायला तिने सुरुवातही केली आहे. मंदिराने अलिकडेच इन्स्टाग्रामवर वर्कआऊट केल्यानंतर तिचा एक हस-या चेह-याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिले आहे, 'या खास व्यक्तीच्या मागणीवरून फोटो काढण्यात आला आहे...' कोण आहे ही खास व्यक्ती मंदिराने इन्स्टाग्रामवर जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती वर्कआऊटच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. अर्थात हा फोटो देखील वर्कआऊट केल्यानंतर काढण्यात आला आहे. कारण या फोटोमध्ये मंदिरा घामाघूम दिसत आहे.. हा फोटो शेअर करत मंदिराने लिहिले आहे, 'जेव्हा माझी छोटीसी लेक वर्कआऊटनंतर ती मला हसायला सांगते तेव्हा endorphins आपले काम करतात... मग तिला नाही कसे म्हणू? ' असे लिहित मंदिराने तिच्या या पोस्टच्या शेवटी #beginagain #ilovemondays हे हॅशटॅग वापरले आहेत. मंदिरा अनेकदा सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. अधूनमधून पती राजसोबतचे फोटो शेअर करत ती त्यांना किसी मिस करते हे देखील सांगते... दरम्यान, मंदिरा बेदीचे पती आणि निर्माता, दिग्दर्शक राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३० जून २०२१ रोजी निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. राज यांच्या अचानक जाण्यामुळे मंदिरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु या दुःखातून मंदिरा आपल्या मुलांकडे पाहून सावरत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lm8frz