Full Width(True/False)

जिओचे दोन भन्नाट प्लान्स, फक्त १ रुपये अतिरिक्त खर्चून मिळेल ५६ जीबी अधिक डेटा

नवी दिल्ली : रिलायन्स जिओकडे ९८ रुपयांपासून ते ३,४९९ रुपयांपर्यंतचे आहे. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएससह अनेक फायदे मिळतात. जिओकडे ५९८ रुपये आणि ५९९ रुपयाचे प्लान्स आहे. या प्लान्समध्ये केवळ १ रुपयाचा फरक असून, तुम्ही १ रुपये जास्त खर्च करून २८ दिवसांची अधिक वैधता आणि ५६ जीबी डेटा मिळवू शकता. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: जिओचा ५९८ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या ५९८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यामध्ये दररोज २ जीबी यानुसार एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लानची खास गोष्ट म्हणजे यामध्ये डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. सोबतच, अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. जिओचा ५९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ८४ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण १६८ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. याशिवाय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. सोबतच, जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. दोन्ही प्लान्समध्ये १ रुपयाचा फरक ५९८ रुपयांच्या प्लानची तुलनेत केवळ १ रुपये जास्त खर्च करून ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला ८४ दिवसांची वैधता मिळते. ५९८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. म्हणजे ५९९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस अधिक आहे. डेटाबद्दल सांगायचे तर ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. तर ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये ११२ जीबी डेटा मिळतो. ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ जीबी डेटा अधिक मिळेल. एकूणच, १ रुपया जास्त खर्चून तुम्हाला २८ दिवस अधिक वैधता आणि ५६ जीबी अधिक डेटा मिळेल. मात्र, ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते, जे ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळत नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D8OXMC