Full Width(True/False)

Vivo Y33s भारतात लाँच, फोनमध्ये ५० MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, जाणून घ्या किंमत- फीचर्स

नवी दिल्ली : भारतात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. फोनमध्ये ५० MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह इतरही काही भन्नाट फीचर्स देण्यात आली आहे. जाणून घ्या नव्याने लाँच झालेल्या Vivo Y33s फोनची किंमत आणि वैशिष्ट्यांबद्धल सर्व काही. वाचा: Vivo Y33s ची भारतातील किंमत Vivo Y33s ची किंमत १७,९९० रुपये आहे. ही किंमत फक्त ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसाठी आहे. डिव्हाइस अॅमेझॉनवर लिस्ट असून सोबत १७,०९० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. Vivo Y33s ची वैशिष्ट्ये Vivo Y33s मध्ये FHD+ (२४०० x १०८० पिक्सेल) रिझोल्यूशनसह ६.५८ इंच हॅलो फुलव्यू डिस्प्ले आहे. यात ९०.६% स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि ब्लू लाइट फिल्टर आहे. यात १२ nm ऑक्टा कोर मीडियाटेक हेलियो जी ८० चिपसेट आहे. यासह ८ GB फिजिकल रॅम आणि ४GB देण्यात आली आहे. फोनमध्ये १२८ GB ची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते १TB पर्यंत वाढवता येते. यात साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Vivo Y33s Android 11 वर आधारित Funtouch OS ११.१ वर चालतो. त्याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Vivo Y33s चा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. यात २ मेगापिक्सलचा बोकेह सेन्सर, २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. ट्रिपल रियर कॅमेरामध्ये सुपर नाईट मोड, अल्ट्रा स्टेबल व्हिडिओ, सुपर एचडीआर आणि आय ऑटोफोकस सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये ५,००० mAh ची बॅटरी असून १८ W चार्जिंग सपोर्ट आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sCXDWX