Full Width(True/False)

तापसी पन्नू चढणार बोहल्यावर? बहीण शोधतेय वेडिंग व्हेन्यू

मुंबई : अभिनेत्री तिच्या अभिनयाबरोबरच व्यक्तिगत आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. तापसी बॅडमिंटनपटू मैथियस बो याच्यासोबत अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये आहे. तापसीला तिच्या या रिलेशनबद्दल अनेकदा विचारले जाते, परंतु त्याबद्दल ती फार काही बोलत नाही. परंतु अलिकडेच तापसीच्या बहिणीने, शगुन पन्नूने सांगितले की, ती तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी हॉल शोधत आहे. शगुन स्वतः वेडिंग प्लॅनर आहे. तापसीच्या लग्नाबद्दल तिने सांगितले, 'मी तापसीच्या लग्नासाठी अनेक ठिकाणं बघत आहे. अनेक ठिकाणं तर स्वतः जाऊन पाहली आहेत.' बहिणीने सांगितलेल्या या माहितीनंतर तापसी म्हणाली, 'फक्त आता हे नक्की करायचे आहे की लग्न करायचे की नाही.' तापसीने भलेही तिच्या लग्नाबद्दल काहीच सांगितले नाही परंतु दोन्ही बहिणींपैकी कुणा एकीचे तरी लग्न लवकर व्हावे, अशी त्यांच्या पालकांची इच्छा आहे. गेल्या महिन्यात तापसीने सांगितले होते, तिच्या पालकांना तापसी कधीच लग्न करणार नाही अशी भीती वाटत आहे. ती पुढे म्हणाली की, 'माझ्या पालकांनी फक्त इतकेच सांगितले की बाई गं तू प्लीज आता लग्न कर. तू कुणाशीही लग्न कर पण कर. मी कधीच लग्न करणार नाही, अशी चिंता त्यांना सतावत आहे.' पालकांना न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आपण लग्न करणार नाही असे तापसीने स्पष्ट केले होते. तसेच रिलेशनदेखील टाईमपास म्हणून करणार नाही, असेही तिने यावेळी स्पष्ट केले. तापसीच्या कामाबद्दल सांगायचे तर, अलिकडेच तिचा 'हसीन दिलरुबा' हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्यामधील तापसीने साकारलेल्या भूमिकेचे सर्वांनी भरभरून कौतुक केले होते. तिच्या आगामी सिनेमांमध्ये रश्मी रॅकेट, लूप लपेटा, दोबारा, शाबास मिठू आणि ब्लर या सिनेमांचा समावेश आहे. याशिवाय तापसीकडे तीन तामिळ आणि एक तेलुगू सिनेमादेखील आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lMq2sb