Full Width(True/False)

रियलमीचे ग्राहकांना दिवाळी गिफ्ट!, कमी किंमतीत लाँच करणार वॉशिंग मशीन, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः एक चीनी फोन निर्माता कंपनी भारतात आपल्या प्रोडक्ट्सवरून खूपच लोकप्रीय आहे. कंपनीने स्वस्त किंमतीत स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. परंतु, आता एका नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. कंपनी आपल्या टेकलाइफ ब्रँड अंतर्गत आता रियलमी वॉशिंग मशीन लाँच करण्यात येणार आहे. जाणून घ्या ही वॉशिंग मशीन कधी येणार तसेच या वॉशिंग मशीनमध्ये काय असणार आहे. वाचा: कंपनीचे अधिकृत वक्तव्य रियलमी इंडिया आणि यूरोपचे सीईओ माधव शेठ यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आपली रियलमी टेकलाइफ ब्रँड अंतर्गत वॉशिंग मशीन आणि काही गुड्स लाँच करणार आहे. हे कंपनीसाठी पहिली वेळ असेल असे काही प्रोडक्ट्स लाँच करण्याची. दिवाळी पर्यंत रियलमीची वॉशिंग मशीन लाँच केली जावू शकते. रियलमीचा उद्देश आहे की, प्रत्येक प्रोडक्टचे उत्पादन करून त्याला मार्केटमध्ये आणले जावू शकते. हेयर ड्रायर आणि रोबोट व्हॅक्यूम क्लिनर सारखे प्रोडक्ट लाँच केल्यानंतर आता कंपनी वॉशिंग मशीन लाँच करणार आहे. वाचा: कशी असेल वॉशिंग मशीन या वॉशिंग मशीनच्या फीचर्स किंवा त्यासंबंधी कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, आपल्या एका इव्हेंटमधून माधव शेठ यांनी याची माहिती दिली आहे. या वॉशिंग मशीनमध्ये कपडे समोरून टाकले जातील. हे एक फ्रंट लोड वॉशिंग मशीन असू शकते. रियलमीच्या जुन्या प्रोड्क्ट्सच्या किंमतीच्या तुलनेत ही थोडी महाग असू शकते. एक अंदाज लावला जात आहे की, हे रियलमीच्या अन्य प्रोड्क्ट्स प्रमाणे या वॉशिंग मशीनला ग्राहक रियलमीच्या लिंक अॅपच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनने कंट्रोल करू शकतील. या वॉशिंग मशीनमध्ये अन्य काय खास असेल यासंबंधी माहिती समोर आली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jfghkJ