Full Width(True/False)

म्हणून कंपनी Realme Narzo 40 ऐवजी Realme Narzo 50 सीरीज लाँच करणार, पाहा काय आहे त्यामागचे कारण

नवी दिल्लीः रियलमी नार्जो ३० सीरीजच्या स्मार्टफोन्सला खूप पसंत केले जात आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीला चार स्मार्टफोन नार्जो 30A, नार्जो 30, नार्जो 30 5G आणि नार्जो 30 प्रो 5G स्मार्टफोनला लाँच केले होते. कंपनीच्या नार्जो सीरीजवरून लेटेस्ट माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार, कंपनी लवकरच भारत आणि थायलँड मध्ये नार्जो ३० सीरीजला नार्जो ५० सीरीज रिप्लेस करू शकते. या सीरीज अंतर्गत लाँच होणारा सर्वात पहिला स्मार्टफोन नार्जो 50A 4G असू शकतो. वाचा: BIS आणि NBTC वर लिस्ट झाला स्मार्टफोन रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ब्लूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) आणि थायलँडच्या NBTC ने RMX3430 मॉडल नंबरच्या या रियलमी स्मार्टफोनला सर्टिफाय केले आहे. BIS लिस्टिंग संबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु, NBTC च्या लिस्टिंग मध्ये सांगितले की हा फोन 4G LTE डिवाइस आहे. मार्केट मध्ये हा रियलमी नार्जो 50A 4G च्या नावाने एन्ट्री करणार आहे. वाचा: रियलमी नार्जो ४० सीरीजला केले स्कीप रियलमी नार्जो ३० सीरीज नंतर आता कंपनीची नार्जो ५० सीरीजच्या लाँचिंगची चर्चा होत आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, नार्जो ४० सीरीजच्या जागी थेट नार्जो ५० सीरीजच्या स्मार्टफोन्सला लाँच करण्याचा निर्णय घेतला जावू शकतो. कंपनीने रियलमी ४ किंवा रियलमी X4/X40 नावाने कोणतेही डिव्हाइस लाँच करणार नाही. त्याच्यामागे एक वेगळेच कारण आहे. चीनमध्ये नंबर ४ हे अशुभ मानले जाते. त्यामुळे कंपनी नार्जो ४० सीरीजच्या जागी नार्जो ५० सीरीजला लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा: नार्जो ५० सीरीज अंतर्गत लाँच होवू शकतात ३ नवीन फोन नार्जो ५० सीरीज अंतर्गत कंपनी कोणते डिव्हाइस लाँच करू शकते. यासंबंधी अजून पक्के काही सांगता येत नाही. परंतु, अफवेनुसार, नार्जो 50A शिवाय, नार्जो ५० आणि नार्जो ५० प्रो ची एन्ट्री करू शकते. नार्जो ५० आणि ५० प्रो ४जी सोबत ५जी नेटवर्क सपोर्ट सोबत येईल. कंपनीने आपली नार्जो २० सीरीजला सप्टेंबर मध्ये लाँच केले होते. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, या फोनला पुढच्या महिन्यात लाँच केले जावू शकते. वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38kwgaV