Full Width(True/False)

प्रेक्षकांवर चालली नाही अमिताभ- इम्रान यांची जादू, जाणून घ्या 'चेहरे' ची कमाई

मुंबई- बॉलिवूडचे महानायक असलेले आणि अभिनेता यांच्या मुख्य भूमिका असलेला '' नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'चेहरे' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा होती. 'चेहरे' कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर देखील चर्चेत होता. असं असूनही प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. इम्रान आणि अमिताभ यांसारखे अनुभवी कलाकार असूनही चित्रपटाने म्हणावी तितकी कमाई केलेली नाही. प्रदर्शनाच्या दोन दिवसात चित्रपटाने केलेली कमाई निराशाजनक असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात करोनामुळे लागू केलेल्या निर्बंधानुसार काही भागात चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरु आहेत तर काही भागात संपूर्ण निर्बंध असल्याने चित्रपटगृहांवर बंदी घालण्यात आली आहे. देशातील इतर राज्यातदेखील चित्रपटगृहांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत प्रदर्शित करण्यात आलेला 'चेहरे' पहिल्या दिवशी एक कोटी रुपयांची कमाई करेल अशी शक्यता चित्रपट विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु, आतापर्यंत चित्रपटाने या रकमेच्या अर्धी कमाई देखील केलेली नाही. 'चेहरे' चित्रपटाची आतापर्यंतची कमाई फक्त ४० लाखांच्या आसपास आहे. चित्रपटाची योग्य पद्धतीने प्रसिद्धी आणि वितरण न केल्याने 'चेहरे' ला बॉक्स ऑफिसवर प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे. पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये एक डझन प्रेक्षकही उपस्थित नव्हते. चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई अमिताभ आणि इम्रान यांच्या इतर चित्रपटांच्या मानाने खूप मानली जातेय. चित्रपटाचा निर्मिती खर्च चित्रपटाच्या प्राईम व्हिडीओ आणि सॅटेलाइट अधिकारांच्या विक्रीतून यापूर्वीच पूर्ण झाला आहे. चित्रपटातून निर्मात्यांना मिळणारा नफा मात्र फारच कमी आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WA0cx9