Full Width(True/False)

या गाजलेल्या चित्रपटासाठी हृतिक रोशन होता पहिली पसंती, नकार दिल्याचा त्याला होतोय पश्चाताप

मुंबई- आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारा बॉलिवूड अभिनेता चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हृतिकने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर यशाचं शिखर सर केलं. चाहते तर हृतिकची एक झलक पाहण्यासाठी जीवाचं रान करतात. हृतिकच्या प्रत्येक चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उदंड प्रतिसाद मिळतो. परंतु, असेही काही चित्रपट आहेत ज्यासाठी हृतिकला विचारणा करण्यात आली होती. काही कारणामुळे हृतिकने चित्रपट करण्यास नकार दिला आणि ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. १. प्रेक्षकांचा यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही परंतु, 'बाहुबली' चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांनी हृतिकला घेण्याचं ठरवलं होतं. परंतु, हृतिकने ही भूमिका करण्यास नकार दिला. याचा खुलासा स्वतः राजामौली यांनी एका मुलाखतीत केला होता. २. आमिर खानची मुख्य भूमिका असलेला 'रंग दे बसंती' मधील करण सिंघानियाच्या भूमिकेसाठी हृतिकला विचारणा करण्यात आली होती परंतु, 'क्रिश' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने हृतिकने नकार दिला होता. ३. स्वदेश आशुतोष गोवारीकर निर्मित 'स्वदेश' चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी शाहरुख खानपूर्वी हृतिकला विचारणा करण्यात आली होती. परंतु, हृतिकने चित्रपटासाठी नकार दिला. ४. दिल चाहता है फरहान अख्तर याचा गाजलेला चित्रपट 'दिल चाहता है' मधील सिडच्या भूमिकेची ऑफर हृतिकला देण्यात आली होती. परंतु, हृतिकने नकार दिल्यानंतर ती भूमिका अक्षय खन्नाला देण्यात आली. ५. मैं हू ना 'मैं हू ना' या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी देखील प्रथम हृतिकची निवड करण्यात आली होती. हृतिकने चित्रपटाच्या काही भागांचं चित्रीकरण देखील पूर्ण केलं होतं. परंतु, पुढे तारखा नसल्याने त्याला चित्रपट सोडावा लागला. ६. लगान आमिरच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'लगान' चित्रपटासाठी निर्मात्यांनी हृतिक, शाहरुख आणि अभिषेकला संपर्क केला होता. परंतु, या सगळ्यांनीच चित्रपटाला नकार दिला आणि चित्रपट हिट ठरला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DBnL9R