अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबद्दल आता अनेक खुलासे होत आहे. तो एक नवीन अपॅ लॉन्च करणार होता. या अॅपसाठी त्यानं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना ऑफर दिली होती, असं आता समोर येत आहे. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी समोर येऊन याबद्दल सांगितलं आहे. याच प्रकरणात सामिल असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ हिनं आणखी एक धक्कादायक दावा केला होता. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी यांना नवीन अॅपवरील चित्रपटासाठी कास्ट करणार होता, असं तिनं म्हटलं होतं.आता आणखी एका मराठी अभिनेत्री याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्री हिनं तिला देखील राज कुंद्राच्या कंपनीकडून ऑफर आली होती, असं म्हटलं आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतल तिनं या बद्दल सांगितलं आहे. राज कुंद्राच्या कंपनीतील कास्टिंग डायरेक्टरनं तिला संपर्क करत या अॅपसाठी फोटो आणि व्हिडिओ शूट करावे लागतील, असं सांगितलं होतं. परंतु कामाबद्दल स्पष्टता नसल्यानं मनिषानं ही ऑफर नाकारली होती, असंही तिनं स्पष्ट केलं. तसंच कामाबद्दल बोलताना न्यूड किंवा अडल्ट कन्टेंट याबद्दल काहीही बोलणं झालं नसल्याचंही तिनं या मुलाखतीत सांगितलं आहे. ...म्हणून राज कुंद्राला अटक करावीच लागली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या कंपनीच्या दोन अॅप्समधून ५१ अश्लील चित्रपट जप्त केले होते. राज व त्याचा तांत्रिक साहाय्यक रायन थॉर्प यांनी संबंधित व्हॉट्सअॅपवरील या प्रकरणाशी संभाषण व व्हॉटसअॅप ग्रुप डिलीट करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पोलिसांसमोर या दोघांना अटक करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. म्हणूनच अटक करण्यात आली’, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37gTpKC