नवी दिल्लीः आज जवळपास अर्ध्याहून अधिक लोकांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरीची समस्या निर्माण होते. सामान्य चार्जर आणि प्लगपॉइंट विना फोनची बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी पॉवर बँक जवळ असणे कधीही फायदेशीर आहे. 10,000mAh चे पॉवरबँक तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः One Plus 10,000mAh पॉवरबँक ९९९ रुपये किंमतीचा हा जबरदस्त पॉवरबँक तुम्ही अॅमेझॉन आणि वन प्लसच्या ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करू शकता. हा एक हलका पोर्टेबल चार्जर आहे. याचे वजन फक्त २५५ ग्रॅम आहे. ईयरफोन्स आणि स्मार्टवॉच सारखे कमी पॉवरच्या डिव्हाइसला चार्ज करण्यासाठी यात लो पॉवर मोडची सुविधा दिली आहे. वन प्लसचे हे पॉवर बँक इनपूट आणि आउटपूट दोन्हीसाठी १८ फास्ट चार्जिंगचा वापर केला आहे. वाचाः Philips DLP1710CB 10,000mAh पॉवरबँक फिलिप्सच्या या पॉवर बँक मध्ये तुम्हाला दोन आउटपूट यूएसबी टाइप ए पोर्ट मिळतील. मायक्रो यूएसबी आणि टाइप सी इनपूट सोबत येणाऱ्या पोर्टेबल चार्जर मध्ये ओव्हर हीट व्होल्टेज करंट प्रोटेक्शन दिले आहे. याची किंमत ७९९ रुपये आहे. 10,000mAh Mi पॉवरबँक 3i शाओमीच्या वेबसाइटवर ८९९ रुपयात मिळणारा हा पॉवरबँक भारतात खूपच लोकप्रिय आहे. याच्या फीचर्स मध्ये १८ वॉट स्मार्ट चार्जिंग सोबत यूएसबी टाइप सी आणि मायक्रो यूसबी पोर्ट्स म्हणजेच ड्युअल इनपूटची सुविधा दिली आहे. याच्या स्मार्ट पॉवर मॅमेजमेंट फीचर सोबत लवकर चार्ज केले जाते. वाचाः Oppo 10,000mAh पॉवरबँक ओप्पोचा हा पॉवरबँक १८ वॉट फास्ट चार्जिंग, लो-करंट चार्जिंग मोड आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्टची सुविधा दिली आहे. याशिवाय, ड्युअल कनेक्टरने तुम्ही मायक्रो यूएसबी आणि यूएसबी टाइप सी पोर्ट, दोन्ही बदलून याचा वापर करता येवू शकतो. फ्लिपकार्टवर याची किंमत १ हजार ९९ रुपये आहे. Syska 10,000mAh पॉवरबँक अॅमेझॉनवर ७४९ रुपयांचा हा पॉवरबँक सोबत तुम्हाला अनेक कनेक्टर्स मिळतात. आउटपूटसाठी दोन स्टँडर्ड यूएसबी पोर्ट्स, एक मायक्रो यूएसबी पोर्ट आणि इनपूटसाठी एक यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jpxVAM