नवी दिल्ली : भारतात प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे कागदपत्रं आहे. आधार नसल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यास देखील अडथळा येऊ शकतो. सरकारी व खासगी सुविधांसाठी आता ने एक दिवसांच्या बाळाचे देखील आधार कार्ड बनवण्यास सुरूवात केली आहे. यासाठी पालक बाळाचे हॉस्पिटल डिस्चार्ज सर्टिफिकिटे आणि आई-वडिलांपैकी एकाचे आधार कार्ड जमा करून अर्ज करू शकतात. मात्र, मुलांचे आधार कार्ड अपडेट न केल्यास ते बंद होऊ शकते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: हे काम करणे गरजेचे बाळ ५ वर्षांचे झाल्यानंतर त्याचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन गरजेचे आहे. असे न केल्यास बाळाचे आधार कार्ड बंद होऊ शकते. बाळ पाच वर्षांचे झाल्यानंतर बायोमेट्रिक डिटेल्स कसे व्हेरिफाय कराल, त्यासंदर्भात प्रक्रिया जाणून घेऊया. UIDAI ने दिली माहिती बाल आधारचा उपयोग केवळ ५ वर्षांपर्यंत करता येतो. बाळ पाच वर्षाचे झाल्यावर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन न केल्यास आधार बंद होईल. अपडेट करण्यासाठी असे शोधा आधार सेंटर बाळाचे आधार कार्ड तुम्ही आधार केंद्रावर जाऊन उपडेट करू शकता. यासाठी यूआयआडीएआयची वेबसाइट appointments.uidai.gov.in/easearch.aspx वर क्लिक करून तुम्ही आधार सेंटरची माहिती घेऊ शकता. यामुळे बाळाचे शाळेचे अॅडमिशन करताना किंवा अन्य कामात अडथळा येणार नाही. ५ वर्षानंतर अपडेट केल्यानंतर १५ वर्षांच्या मुलाचे देखील बायोमेट्रिक्स आधारमध्ये अपडेट करावे लागेल. मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत आहे. बाळाच्या आधारसाठी घरबसल्या असा करा अर्ज
- यासाठी सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. येथे आधार कार्ड रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
- आता मुलाचे नाव, पालकाच्या नावासह इतर माहिती भरा. आधार एनरोलमेंट फॉर्म देखील भरावा लागेल.
- त्यानंतर तुमचा पत्ता, जिल्हा, राज्य इत्यादी माहिती द्या.
- यानंतर अप्वॉइंटमेंट बटनवर क्लिक करा आणि आधार कार्ड रजिस्ट्रेशनसाठी शेड्यूल निवडा. तुम्ही घराच्या जवळील सेंटर निवडू शकता.
- तुम्हाला अप्वॉइंटमेटच्या तारखेला एनरोलमेंट सेंटरवर जावे लागेल. सोबतच, मुलाचा जन्मदाखला, पालकांच्या आधारची फोटो कॉपी आणि रेफ्रेंस नंबर देखील घेऊन जावा लागेल.
- एनरोलमेंट सेंटरवर सर्व डॉक्यूमेंट्स तपासल्यानंतर बायोमेट्रिक माहिती मुलांच्या आधार कार्डशी लिंक केली जाईल. ५ वर्षांपेक्षा लहान मुलांचे केवळ फोटोग्राफ रजिस्टर केले जाते.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकनॉलेजमेंट नंबर दिला जाईल. याच्या मदतीने तुम्ही अर्जाचे स्टेट्स जाणून घेऊ शकता.
- रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ६० दिवसांनी एक एसएमएस येईल. ९० दिवसांनी तुम्हाला बाळाचे आधार कार्ड मिळेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z4YlyC