Full Width(True/False)

खास ऑफर! सिलेंडर बुकिंगवर मिळणार २७०० रुपये कॅशबॅक, आज बुक करा महिन्याने द्या पैसे

नवी दिल्ली : भारतातील प्रमुख डिजिटल फायनेंशियल सर्व्हिसेज प्लॅटफॉर्म पेटीएमने एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी आकर्षक कॅशबॅक आणि अन्य बक्षीसांची घोषणा केली आहे. नवीन यूजर्स ‘३ पे २७०० ’चा फायदा घेऊ शकतात. यात सुरुवातीचे तीन महिने पहिल्या बुकिंगसाठी ९०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तर आधीच्या यूजर्सला प्रत्येक बुकिंगवर बक्षीस आणि ५००० पर्यंतचे कॅशबॅक पॉइंट्स मिळतील. याद्वारे डील्स आणि गिफ्ट वाउचर्स रिडिम करता येईल. वाचाः ‘३ पे २७०० कॅशबॅक ऑफर’ , आणि या तिन्ही एलपीजी कंपन्यांच्या सिलेंडर बुकिंगवर लागू आहे. ग्राहक पोस्टपेड सुविधेचा देखील लाभ घेऊ शकतात. यात 'पेटीएम नाउ पे लेटर' अंतर्गत सिलेंडर बुकिंगचे पेमेंट पुढील महिन्यात करू शकता. कंपनीने नवीन फीचर्सद्वारे सिलेंडर बुकिंग करणे सोपे केले आहे. या फीचर्सद्वारे यूजर्स आपल्या गॅस सिलेंडर्सची डिलिव्हरी ट्रॅक करू शकतात व रिफिल्ससाठी ऑटोमेटेड इंटेलिजेंट रिमाइंडर्स देखील मिळेल. बुकिंगसाठी यूजर्सला केवळ 'Book ' टॅबवर जायचे आहे. गॅस कंपनीला सिलेक्ट करायचे आहे. मोबाइल नंबर किंवा एलपीजी आयडी/कंझ्यूमर नंबर टाकल्यानंतर पेमेंट करायचे आहे. पेमेंट , पेटीएम यूपीआय, कार्ड्स किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येईल. सिलेंडरची डिलिव्हरी जवळील गॅस एजेंसीद्वारे घरपोच होईल. पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले की, आमचे लक्ष्य देशातील प्रत्येकासाठी यूटिलिटी पेमेंट्स सोपे आणि पूर्णपणे डिजिटल करणे आहे. सर्व यूटिलिटीमध्ये एलपीजी सिलेंडरचे बुकिंग भारतीय कुटुंबासाठी वारंवार होणाऱ्या खर्चांपैकी एक आहे. आम्ही या यूटिलिटीसाठी डिजिटल पेमेंट्सद्वारे यूजर्सला चांगला अनुभव देण्यास कटिबद्ध आहोत. गेल्या काही दिवसात आम्ही एलपीजी सिलेंडरचे बुकिंग आणि रिफिल्ससाठी पेमेंट ऑनलाइन करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे पाहिले आहे. नवीन ऑफर्स आणि चांगल्या यूआयसह आम्ही नवीन यूजर्सपर्यंत पोहचण्याचा आणि सध्याच्या यूजर्सचे रिपीट ट्रांझॅक्शन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. पेटीएमने गेल्यावर्षी एचपी गॅससोबत भागीदारी करत 'बुक अ सिलेंडर' सुविधा सुरू केली होती. यानंतर इंडिया ऑइलच्या इण्डेन आणि भारत गॅससोबत देखील भागीदारी केली. या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत असून, याचे मुख्य कारण कोणत्याही अडथळ्याशिवाय बुकिंग करता येणे हे आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3juQP9M