Full Width(True/False)

याला पॉर्न म्हणतात का? गहना वशिष्ठच्या न्यूड लाइव्ह सेशनमुळे खळबळ

मुंबई- अश्लील व्हिडीओ बनविल्याप्रकरणी अभिनेत्री हिला फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. गहनावर राज कुंद्रा याच्या अश्लील व्हिडीओंना दिग्दर्शित केल्याचाही आरोप आहे. सध्या गहना जामिनावर बाहेर आहे. गहनाच्या काही व्हिडीओंचा पोलिसांनी अश्लील व्हिडिओंच्या यादीत समावेश केल्याने गहनाने असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गहनाने आपले व्हिडीओ अश्लील नसल्याचं सिद्ध करण्यासाठी चक्क इन्स्टाग्रामवर लाइव्ह न्यूड सेशन केलं आहे. यात तिने कोणत्याही प्रकारचे कपडे घातले नसल्याचं म्हणत हा व्हिडीओ अश्लील आहे का, अशी चाहत्यांना विचारणा केली आहे. गहनाने तीन मिनिटांचं न्यूड लाइव्ह सेशन केलं आहे. या लाइव्ह सेशन दरम्यान गहनाने चाहत्यांना अनेक प्रश्न विचारले. गहनाने म्हटलं, 'मला तुम्हाला विचारायचंय मी अश्लील दिसतेय का? मी घाणेरडी दिसतेय? मी अशी दिसतेय का की ज्यामुळे तुम्ही या व्हिडीओला पॉर्न व्हिडिओ म्हणाल? तुम्ही या व्हिडिओला अश्लील म्हणू शकत नाही मग ज्यात मी चांगले कपडे घातले आहेत त्यांना अश्लील का म्हटलं जातंय? दरम्यान एका युझरने गहनाला विचारलं की, आम्ही तुझ्यावर विश्वास का ठेवू? त्यावर उत्तर देत गहना म्हणाली, मला तुम्हाला हे सिद्ध करून दाखवायची गरज नाहीये पण मी खरच काहीच घातलेलं नाहीये.' लाइव्ह सेशन इन्स्टाग्रामवर शेअर करत गहनाने लिहिलं, 'आता मी कपड्यांशिवाय लाइव्ह आलेली आहे. मी या व्हिडिओत कोणतेच कपडे घातले नाहीयेत. पण आता हे कोणीही म्हणत नाहीये की हा व्हिडीओ अश्लील आहे. पण जेव्हा मी कपडे घालून व्हिडीओ बनवले त्या व्हिडीओंना अश्लील व्हिडिओंचा दर्जा दिला गेला. खोटेपणाची हद्द आहे.' गहनाला मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पोलीस गहनाला पुन्हा अटक करू नयेत म्हणून गहनाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rONLZH