नवी दिल्ली : स्मार्टफोनचा वापर केवळ संपर्क साधण्यासाठीच नाही तर फोटो काढण्यापासून गेम खेळण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी केला जातो. या डिव्हाइसमध्ये वेगवेगळे देखील देण्यात आलेले असतात, ज्यामुळे फोन व्यवस्थित काम करेल. स्मार्टफोन्समध्ये कोणते सेंसर्स दिलेले असतात व ते कसे काम करतात याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: हे खूप महत्त्वाचे सेंसर आहे. एखादी गोष्ट फोनच्या जवळ आल्यास या सेंसरला त्याची माहिती मिळते. हे सेंसर फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याजवळ असते. यूजर्स कॉलवर बोलत असताना हे सेंसर आपोआप स्क्रीनची लाइट बंद करते. हे सेंसर स्मार्टफोनला ओरिएंटेशन ठरवण्यास मदत करते. सेंसरचा मुख्य उद्देश पोर्ट्रेट अथवा लँडस्केप मोडमध्ये ठेवला आहे की नाही व त्यानुसार स्क्रीनवर कॉन्टेंट ऑप्टिमाइज करणे हा आहे. युट्यूबवर व्हीडिओ पाहताना किंवा गॅलेरीमध्ये फोटो पाहताना याचा विशेष फायदा होतो व हे सेंसर्स पोर्ट्रेट व लँडस्केप मोडनुसार काम करते. हे सेंसर स्मार्टफोनमध्ये एक्सेलेरोमीटर सेंसरसह काम करते. हे मोशन डिटेक्शन जसे रोटेशन अथवा ट्विस्टसाठी मूव्हमेंटला योग्य दिशा देते. फोनमध्ये दिसणाऱ्या ३६० डिग्री फोटोच्या मागे हेच सेंसर असते. याशिवाय मोशन सेंसिटिव्ह गेम खेळण्यास देखील हे मदत करते. सर्व रेंज डिव्हाइसमध्ये बायोमॅट्रिक सेंसर दिले जाते. यामध्ये फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक सेंसरचा समावेश आहे. या सेंसरच्या मदतीने यूजर्स डिव्हाइस आणि खासगी डेटा सुरक्षित ठेवू शकतात. सेंसर यूजरच्या बोट आणि चेहरा स्कॅन करते. फोन अनलॉक करताना बोट आणि चेहरा स्कॅन केल्यानंतर हे सेंसर माहिती एकत्र करते व फोनला अनलॉक करते. NFC चा अर्थ आहे Near-field communication. या सेंसरच्या मदतीने तुम्ही १० सेंटीमीटरपर्यंतच्या क्षेत्रात दोन डिव्हाइसला कनेक्ट करू शकता. याच्या मदतीने डेटा ट्रांसफर, ऑनलाइन पेंमेंट करणे शक्य आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38tOmr0