मुंबई :'' या मालिकेत यांच्या लग्न विशेष भागानंतर एक रंजक वळण आलं. ते म्हणजे स्वीटूचं लग्न ओमशी न होता मोहितबरोबर झालं. या भागानंतर मालिकेवर बरीच टीका झाली. या बोचऱ्या टीकांमधूनच ओम आणि स्वीटू एकत्र यावे अशाही प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे या मालिकेत आता अजून एक रंजक वळण येणार आहे. ओम आणि स्वीटूला एकत्र आणण्यासाठी या मालिकेत एका नवीन चेहऱ्याची एंट्री होणार आहे. अभिनेत्री आता या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती सकारात्मक भूमिकेत दिसणार असून तिच्यामुळे ओम आणि स्वीटू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या भूमिकेबद्दल प्रिया म्हणाली, 'मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. प्रेक्षकांचे लाडके ओम आणि स्वीटू यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यात माझ्या व्यक्तिरेखेचा खूप मोठा सहभाग असणार आहे. मी सकारात्मक; पण तितकीच ठसकेबाज भूमिका निभावतेय. त्यामुळे ती प्रेक्षकांनाही आवडेल याची मला खात्री आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3t0QNKO