Full Width(True/False)

दररोज ३ जीबी डेटाचे सर्वात स्वस्त प्लान, किंमत ३५० रुपयांपेक्षा कमी, अनलिमिटेड कॉलिंगही फ्री

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारखी टेलिकॉम कंपनी दरम्यान स्वस्त प्लान लाँच करण्याची चढाओढ लागली आहे. या तिन्ही कंपन्याकडे जवळपास सर्वच बजेट मध्ये रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. परंतु, अनेकदा ग्राहकांना कळत नाही की, कोणता प्लान चांगला आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या तिन्ही कंपन्यांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटाचे सर्वात स्वस्त प्लान संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या कोणत्या कंपनीचा प्लान किती बेनिफिट देतो. वाचाः Vodafone Idea चा ३९८ रुपयाचा प्लान वोडाफोनचा रोज ३ जीबी डेटाचा सर्वात स्वस्त प्लानची किंमत ३९८ रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसाची वैधता मिळते. या प्रमाणे ग्राहकांना या प्लान मध्ये एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्वच नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. याशिवाय, बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV VIP चे अॅक्सेस दिले जाते. वाचाः Airtel चा ३९८ रुपयाचा प्लान वोडाफोन आयडिया प्रमाणे एअरटेलचा प्लान सुद्धा ३९८ रुपयांचा आहे. यात ग्राहकांना २८ दिवसाची वैधता आणि रोज ३ जीबी डेटा मिळतो. यात ग्राहकांना रोज ३ जीबी डेटा प्रमाणे एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस फ्री ट्रायल, Airtel Xstream प्रीमियम, Free Hellotunes आणि Wynk Music Free ची मेंबरशीप मिळते. वाचाः Jio चा ३४९ रुपयाचा प्लान रिलायन्स जिओचा प्लान यात सर्वात स्वस्त आहे. जिओचा ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळत असून रोज ३ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण ८४ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. सोबत या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37qOTJC