मुंबई- बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार ठरलेल्या अभिनेत्री यांच्या आयुष्यात अनेक चढ- उतार आले. परंतु, त्यांचं अचानक जाणं कित्येकांच्या मनाला चटका लावून गेलं. श्रीदेवी यांचे चाहते त्यांच्या जाण्याने प्रचंड दुःखी झाले होते. ८० च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या श्रीदेवी इतक्या लोकप्रिय होत्या की त्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्यापेक्षाही जास्त मानधन घेत. श्रीदेवी आणि यांनी एकत्र अनेक चित्रपट केले. त्याकाळात त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. त्यासोबतच चाहत्यांमध्ये मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. इतकंच नाही तर मिथुन यांच्यासाठी श्रीदेवी यांनी यांना राखी देखील बांधली होती. श्रीदेवी आणि मिथुन यांच्या प्रेमाची सुरुवात १९८४ सालच्या 'जाग उठा इंसान' या चित्रपटाच्या सेटवर झाली. तेव्हा मिथुन यांनी योगिता बालीसोबत विवाह केला होता. श्रीदेवी मिथुन यांच्या प्रेमात इतक्या गुंतल्या होत्या की मिथुन यांचं प्रेम मिळवण्यासाठी त्यांनी बोनी यांना राखी बांधली. बोनी यांना श्रीदेवी आवडत होत्या. बोनी हे श्रीदेवी यांच्या आईचे लाडके होते. त्यांच्या घरी बोनी यांचं येणं- जाणं असे. त्याचप्रमाणे बोनी सेटवरही श्रीदेवी यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत. त्यावरून रागावून मिथुन यांनी श्रीदेवी यांना बोनी यांना राखी बांधायला सांगितली होती आणि श्रीदेवी यांनी ते मान्यही केलं. असंही म्हटलं जातं की मिथुन आणि श्रीदेवी यांनी १९८५ साली गुपचूप लग्नगाठ बांधली होती. जेव्हा योगिता यांना मिथुन आणि श्रीदेवी यांच्या लग्नाबद्दल कळालं तेव्हा त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. ते पाहून मिथुन यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले. त्यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांना सोबत केली. भलेही बोनी तेव्हा विवाहित होते परंतु, श्रीदेवी यांच्यासाठी बोनी यांनी पहिल्या पत्नी मोना शौरीला घटस्फोट दिला आणि नव्याने संसार थाटला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sfJChq