Full Width(True/False)

'कौन बनेगा करोडपती' मध्ये सहभागी होणं पडलं महागात, रेल्वे अधिकारी अडचणीत

मुंबई: '() या शो मुळे अनेकांनी आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर मोठी रक्कम जिंकत स्वप्न पूर्ण केली आहेत. देशभरातून अनेकजण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी धडपडत असतात. हॉटसीटवर बसल्यावर आनंदाला पारावा उरत नाही. पण याच हॉटसीटवर बसणं एका रेल्वे अधिकाऱ्याला महागात पडल्याचं समोर आलं आहे. केबीसीच्या १३ व्या पर्वात काही दिवसांपूर्वी रेल्वे अधिकारी सहभागी झाले होते. हॉटसीटपर्यंत येण्याचं आणि त्यावर बसण्याचं त्यांच स्वप्न पूर्ण झालं होतं. देशबंधू पांडे सहभागी झालेले एपिसोड २६ आणि २७ ऑगस्ट रोजी प्रसारित झाले होते. पण हा आनंद काही दिवसच टिकेल असा त्यांनी विचारही केला नसेल. या शोमध्ये सहभागी झाल्यामुळं त्यांना आता अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. काय आहे नेमकं प्रकरण? केबीसीमध्ये सहभागी होऊन राजस्थानमधील कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक विभागाचे कार्यालय अधीक्षक देशबंधू पांडे यांनी तब्बल ३ लाख २० हजार रुपये इतकी रक्कम जिंकली. असं असलं तरी या शोमुळं त्यांच्या सरकारी नोकरीत आता अडचणी येत असल्याचं चित्र आहे. रेल्वे प्रशासनाने त्यांना चार्जशीट दिली आहे. तसंच तीन वर्षे त्यांच्या वेतन वाढीवर बंदीही घालण्यात आली आहे. देशबंधू पांडे रेल्वे प्रशासनाला कोणतीही माहिती न देता सुट्टीवर गेले होते. ते या शोमध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी प्रशासनाला कळवणं अपेक्षीत होतं,तेही त्यांनी केलं नाही. त्यांची रजा मंजूर झाली नसताना ते ९ते १३ ऑगस्ट या कालावधीत बेपत्ता होते. त्यांचं हे वागणं रेल्वे सारख्या महत्त्वाच्या विभागात काम करत असताना योग्य नाही. त्यांनी कामाप्रती निष्काळजीपणा केल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YbHZqm